आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2020 04:48 PM2020-09-14T16:48:40+5:302020-09-14T16:54:52+5:30

पला ड्रग्जशी काहीही संबंध नाही, मी कधीही ड्रग्सशी चव चाखलेली नाही असं रिया चक्रवर्ती अनेकदा सांगत होती, मात्र

Rhea chakraborty used her mothers mobile phone chatted about drugs | आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर

आपल्याच जाळ्यात अडकली रिया चक्रवर्ती, ड्रग्स चॅटिंगसाठी करायची आईच्या फोनचा वापर

googlenewsNext

 सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग्स कनेक्शन समोर आल्यानंतर एसीबीने वेगाने चौकशी सुरू केली सुशांत सिंह राजपूतच ड्रग्ज घ्यायचा, आपला ड्रग्जशी काहीही संबंध नाही, मी कधीही ड्रग्सशी चव चाखलेली नाही असं रिया चक्रवर्ती अनेकदा सांगत होती. मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीनंतर अखेर रियाने आपलं ड्रग्ज कनेक्शन असल्याचं सत्य सांगितलं आणि तिला अटक करण्यात आली. राजस्थान पत्रिकाच्या रिपोर्टनुसार, रिया रिया चक्रवर्तीने ड्रग्सच्या व्यवहारासाठी आई संध्या चक्रवर्ती यांच्या नावावर असलेल्या  मोबाईल वापरला केला आहे. या फोनवरुन अनेकांशी ड्रग्जविषयी चॅट केले होते.

रिया करायची आईच्या फोनवरुन चॅट
रिपोर्टनुसार आता या फोनचा संपूर्ण डेट एनसीबीकडे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा ईडीने रियाकडून तिचा फोन मागितला होता तेव्हा तिने तो देण्यास नकार दिला होता. मात्र ज्यावेळी एनसीबीने रियाच्या घरावर छापा मारला तेव्हा तिथून सगळे फोन ताब्यात घेतले. हे चॅटसमोर आल्यानंतर अनेक जण एनसीबीच्या रडारवर आहेत.  रिया तिच्या आईच्या मोबाईलचा वापर दिशाभूल करण्यासाठी करीत होती असा दावा एजन्सीचा आहे. 

ड्रग डीलर्सशी सुशांतचा नव्हता
 संबंध सीबीआय या अँगलनेदेखील तपास करत आहेत की सुशांतच्या नावाखाली रिया व तिचा भाऊ शोवित ड्रग्सचा खेळ तर खेळत नव्हते ना. कारण एनसीबीला आतापर्यंत चौकशीत कुठेही ड्रग डीलरने हे नाही सांगितले की, सुशांतचा त्याच्याशी संबंध होता किंवा त्यांना ओळखत होता. एनसीबीने 20हून अधिक ड्रग डीलरला अटक केली आहे. मात्र आतापर्यंत करमजीत, जैद आणि ऋषिकेश यांच्यासोबत रिया, शोविक, दीपेश सावंत आणि मिरांडा यांच्यासोबत संबंध असल्याचे कबूल केले पण सुशांतशी नाही. सीबीआय आता त्या फार्म हाउसचादेखील तपास करणार आहेत जिथे दिशाचा मृत्यू झाला होता.

 सुशांतच्या घरून रियाने स्वत:च्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा
 सुशांत सिंग राजपूत केस मध्ये ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे. एनसीबीला त्यांच्या तपासात आढळून आले की, लॉकडाऊन दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा काही दिवस रिया चक्रवर्तीच्या घरी घालवायचे होते. यासाठी रिया आणि सुशांतने निर्णय घेतला की, एका फास्ट डिलिव्हरी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गांजा रियाच्या घरी पाठवला जावा. चौकशीतून ही बाब कन्फर्म झाली आहे. एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्ती, शौविक आणि इतरांच्या जबाबातून समजले की, सुशांत आणि रियानने घरच्या काही सामानासोबत एका बॉक्समध्ये जवळपास अर्धा किलो गांजा एप्रिल महिन्यात रियाच्या घरी पाठवला होता. तपासातून असेही समोर आले की, हे काम सुशांतकडे काम करणा-या दीपेश सावंतने केले होते़ त्याने कुरिअर कंपनीला हे सामान रियाच्या सांताक्रूज येथील फ्लॅटवर डिलिव्हर करण्यास सांगितले होते़ रियाच्या घरी हे गांजाचे पॅकेट शौविकने रिसीव्ह केले होते. 

Web Title: Rhea chakraborty used her mothers mobile phone chatted about drugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.