Rhea Chakraborty tweet From Eight Years Ago Is Going viral Again | आठ वर्षापूर्वी रियाने केले होते 'हे' ट्विट, पुन्हा होतंय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण ?

आठ वर्षापूर्वी रियाने केले होते 'हे' ट्विट, पुन्हा होतंय व्हायरल, जाणून घ्या यामागचे कारण ?

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आता भायखळा तुरुंगात आहे. बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या कोठडीतून रियाची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर रियाबद्दल संतप्त तर कधी सपोर्ट कणा-या प्रतिक्रीया उमटत आहेत. एरव्ही रिया चक्रवर्ती फारशी कोणाच्या परिचयाची नव्हती. सुशांत मृत्युप्रकरणामुळे आज अख्या जगाचे रिया चक्रवर्तीवर लक्ष लागले आहे. दरम्यान सोशल मीडियावर आता रियाचे ८ वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल झाले आहे. हे ट्विट पाहून अनेकांनी चांगली इमेज बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे टीकाही करताना दिसत आहे. व्हायरल झालेले ट्विट नेटीझन्स रिट्विटही करत आहेत.  एकीकडे 'जस्टीस फॉर सुशांत' टॅग व्हायरल होत असताना दुसरीकडे 'जस्टिस फॉर रिया' असाही टॅग व्हायरल होत आहे. 

 

रिया चक्रवर्तीचे वडील सैन्यात होते म्हणूनच रियाचं शिक्षण आर्मी पब्लिक स्कूल अंबाला कँटमध्ये झालंय. त्यांची पोस्टिंग होती नागालँडमध्ये झाली होती. त्याच संदर्भात  रियाने 15 जानेवारी 2012 मध्ये एक ट्विट केलं होतं. त्यात तिने म्हटले होते की, माझे वडील नागालँडमध्ये असून आपल्यासाठी ते आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करत असल्याचं म्हटलं आहे. त्याचेवळी तिने भारतीय सैन्याला सलामही या ट्विटमधून केला होता. रियाचे देशप्रेम या ट्विटमध्ये दिसत असले तरी पुन्हा एकदा जुने ट्विट पाहून नेटीझन्स उलट सुलट चर्चांनाही उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे.

जामीन अर्जात रियाने केले धक्कादायक खुलासे

सध्या रियाच्या जामीन याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी सुरु आहे रियाने 'आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,' असे रियाने आपल्या जामीन अर्जात म्हटले आहे.आपल्या जामिन याचिकेदरम्यान रियाने धक्कादायक दावा केला आहे. ती यावेली म्हणाली की, ८० टक्के बॉलिवूड सेलिब्रिटीज ड्रग्स घेतात.

रियाने कधीच ड्रगचे सेवन केले नसल्याचा केला दावा

सुशांतला पूर्वीपासून ड्रगचे व्यसन होते, स्टाफच्या माध्यमातून तो त्याची मागणी करीत असे, आपल्या संबंधात आल्यानंतर मी त्याच्या सूचनेनुसार ती शोविक व अन्य स्टाफच्या माध्यमातून गांजा मागवित होते. त्यासाठी बासित आपल्या घरी येत असल्याची कबूली दिली होती.' केदारनाथ' चित्रपटाच्या शुटिंगच्यावेळी तो सेटवर ड्रग घेत होता. आपण त्याला या व्यसनापासून दूर रहाण्यासाठी वारंवार विनंती करीत होते, तो त्यासाठी तयारही होता. मात्र, मानसिक विकारामुळे त्याला ते शक्य झाले नसल्याचे तिने म्हटले होते. 'तो गांजा सिगारेटमध्ये घालून ओढायचा.आपण मात्र कधीच ड्रगचे सेवन केले नसल्याचा दावाही तिने केला.


 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea Chakraborty tweet From Eight Years Ago Is Going viral Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.