Rhea chakraborty trolled on writing a emotional post on sushant singh rajput after one month | तुझ्या कर्माचं फळ मिळणारच; सुशांत सिंग राजपूतसोबतच्या 'त्या' फोटोवरुन रिया चक्रवर्ती ट्रोल

तुझ्या कर्माचं फळ मिळणारच; सुशांत सिंग राजपूतसोबतच्या 'त्या' फोटोवरुन रिया चक्रवर्ती ट्रोल

अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे निधन होऊन गेल्या मंगळवारी 14 जून 2020 ला एक महिना पूर्ण झाला. सुशांतने वांद्रयातल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या फॅन्सनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. पहिल्यांदा काल कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने सुशांतसाठा सोशल मीडियावर शेअर एक इमोशनल पोस्ट शेअर केली होती. इतकेच नव्हे तर सुशांतच्या मृत्यूनंतर तिचा प्रत्येक फोटो  तिच्या सोशल मीडियावरून काढून टाकणाऱ्या रियाने सुशांतसोबत तिचे अत्यंत सुंदर आणि न पाहिलेले दोन फोटो पहिल्यांदाच शेअर केले. पण सोशल मीडियावरील काही लोकांना रियाची ही पोस्ट आवडली नाही आणि ती ट्रोल होऊ लागली.

 

यूजर्सने विचारले- 'जेव्हा तो जिवंत होता तेव्हा प्रेम...

नीड जस्टिम नावाच्या यूजरने लिहिले-  हे बरोबर नाही. सुशांत जिवंत होता तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबरचे सर्व फोटो डिलीट केले होते, आता त्याच्या मृत्यूनंतर हे फोटो अपलोड करुन खोटा दिखावा करणे बंद कर. देव सर्व काही जाणतो. तुझ्या कर्माचे फळ तुला नक्कीच मिळेल.


 सुशांतसाठी लिहिले एक नोटमध्ये - आज मी वचन देते

मी तुला विसरू शकलेले नाही. तू मला प्रेमावर विश्वास करायला शिकवले. तुझ्यामुळे मला गणित हा विषय सोपा वाटू लागला होता. तू मला रोज नव्या गोष्टी शिकवायचाय. मी तुला कधीच वेगळं करू इच्छित नव्हती. पण आता आपण कधीच भेटू शकणार नाही. मला माहितीये, तू जिथे आहेस तिथे आनंदी आहेत. निश्चितपणे आकाशातील ताऱ्यांनी, चंद्राने, आकाशगंगेने तुझे मनापासून स्वागत केले असेल. तू माझ्यावर किती प्रेम केलेस, हे मी शब्दांत सांगूू शकत नाही. तू माझ्यावर मुक्तपणे प्रेमाचा वर्षाव केला. तुझ्या आत्म्याला शांती लाभो, यासाठी मी प्रार्थना करेल. तू सोडून गेलास त्याला आज 30 दिवस झालेत. मी आयुष्यभर तुझ्यावर असेच प्रेम करत राहिल. आपल्या दोघांचे प्रेम असेच जिवंत राहिल आज मी वचन देते, असे रियाने लिहिले आहे.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea chakraborty trolled on writing a emotional post on sushant singh rajput after one month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.