ठळक मुद्देसुशांत आणि रिया 2013 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’च्या शुटिंगमध्ये व्यस्त होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीवर वेगवेगळे आरोप होत आहेत. रियाने स्वत:वरचे सगळे आरोप धुडकावून लावत, आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे. रिया अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करतेय. पण असे असतानाही लक्झरी लाईफस्टाईल कॅरी करते. गेल्या 12 वर्षांत रिया प्रचंड बदलली. इतकी की, तिचे सुरुवातीचे आणि आत्ताचे फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही.

बॉलिवूडमध्ये आल्यानंतर रियाने स्वत:चे मेकओव्हर केले. रियाने 2009 मध्ये छोट्या पडद्यापासून सुरुवात केली होती. एमटीव्हीवरच्या ‘टीन दिवा’ या रिअ‍ॅलिटी शोमधून तिची सुरुवात झाली होती. यानंतर तिने अनेक शो होस्ट केलेत.

रियाने ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. सोनाली केबल, दोबारा, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती झळकली होती. पण ‘मेरे डॅड की मारूती’ वगळला तर हे सर्वच सिनेमे फ्लॉप झाले होते. अलीकडे आलेला तिचा ‘जलेबी’ हा सिनेमाही दणकून आपटला होता.

अशी झाली होती रिया व सुशांतची पहिली भेट

सुशांत आणि रिया 2013 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी सुशांत ‘शुद्ध देसी रोमान्स’च्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. तर रियाही ‘मेरे डॅड की मारूती’ या सिनेमाचे शुटिंग करत होती.
या दोन्ही सिनेमांचे सेट आजूबाजूलाच होता. त्याचवेळी रिया आणि सुशांत यांची भेट झाली. त्यानंतर सुशांत व रिया अनेक पार्ट्यामध्ये एकमेकांना भेटले.  मग मैत्री झाली. याचकाळात सुशांतचे अंकितासोबत ब्रेकअप झाले. अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर रिया व सुशांत आणखी जवळ आलेत. पण सुशांतचे वडिलांच्या आरोपानुसार, याच रियाने सुशांतला अनेकांपासून दूर केले.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty then and now picture will leave you in shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.