rhea chakraborty shares her first picture on social media after sushant singh rajput demise | भूतकाळ विसरून स्वत:त रमली रिया चक्रवर्ती; पहिल्यांदाच शेअर केला स्वत:चा फोटो

भूतकाळ विसरून स्वत:त रमली रिया चक्रवर्ती; पहिल्यांदाच शेअर केला स्वत:चा फोटो

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे.

सुशांत सिंगराजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) अचानक चर्चेत आली. एक दिवस नव्हता जेव्हा रियाची चर्चा झाली नाही. सुशांतचे नाव निघताच रियाचीही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या नंतर सगळ काही बदलले. इतके की, ड्रग्ज प्रकरणात रिया महिनाभर तुरूंगात गेली.  सोशल मीडियावर ती कधी नव्हे इतकी ट्रोल झाली. यानंतर अनेक महिने रियाने स्वत:ला घरात कैद करुन ठेवले होते. सोशल मीडियापासूनही ती लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. ((Rhea Chakraborty share new post on instagram)

सुशांत मृत्यूनंतर रियाने पहिल्यांदा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. यात ती रवींद्रनाथ टागोरांचे ‘गीतांजली’ हे पुस्तक वाचताना दिसतेय. रवींद्र्रनाथ टागोर यांचीच एक ओळही कॅप्शनमध्ये लिहिली आहे.  
   सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रियाव तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. घर शोधण्याच्या निमित्ताने पहिल्यांदा ती घराबाहेर पडली होती. आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, रिया चक्रवर्ती लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 9 एप्रिलला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु देशात वाढत्या कोरोना प्रकरणामुळे हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. या चित्रपटात रियाबरोबर अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अलीकडेच ‘चेहरे’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty shares her first picture on social media after sushant singh rajput demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.