बाबा सॉरी...! रिया चक्रवर्तीने ‘फादर्स डे’ला मागितली वडिलांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 05:43 PM2021-06-20T17:43:28+5:302021-06-20T17:46:26+5:30

Rhea Chakrabort : रियाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. काही तासांत तिच्या या पोस्टला हजारोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत

rhea chakraborty shares childhood photo with father on fathers day | बाबा सॉरी...! रिया चक्रवर्तीने ‘फादर्स डे’ला मागितली वडिलांची माफी

बाबा सॉरी...! रिया चक्रवर्तीने ‘फादर्स डे’ला मागितली वडिलांची माफी

Next
ठळक मुद्देसुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आज जगभर फादर्स डे साजरा होतोय. अनेक सेलिब्रिटींनी फादर्स डेचे निमित्त साधून वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) यापैकीच एक. वडिलांसाठी रियाने लिहिलेल्या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
रियाने वडिलांसोबतचा एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे. सोबत भावूक पोस्ट लिहिली आहे. ‘बाबा हॅपी फादर्स डे... तुम्ही माझी प्रेरणा आहोत. मला माफ करा, वेळ जरा कठीण आहे. पण मी तुमची मुलगी आहे, याचा मला गर्व आहे. माझे स्टॉन्गेस्ट बाबा, लव्ह यू पापा,’ असे तिने लिहिले आहे. (Rhea Chakraborty shares fathers day post)

रियाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतेय. काही तासांत तिच्या या पोस्टला 71 हजारांपेक्षा लाईक्स मिळाले आहेत.
 सुशांत सिंग राजपूतच्या   निधनानंतर फारशी कोणाला माहीत नसलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती अचानक चर्चेत आली होती.  सुशांतचे नाव निघताच रियाचीही चर्चा व्हायची. सुशांतची गर्लफ्रेंड असलेली रिया आधी आलिशान आयुष्य जगत होती. मात्र सुशांतच्या नंतर सगळ काही बदलले.

इतके की, ड्रग्ज प्रकरणात रिया महिनाभर तुरूंगात गेली.  सोशल मीडियावर ती कधी नव्हे इतकी ट्रोल झाली. यानंतर अनेक महिने रियाने स्वत:ला घरात कैद करुन ठेवले होते. सोशल मीडियापासूनही ती लांबच होती, मात्र आता हळूहळू रिया नव्याने सुरुवात करताना दिसतेय. सोशल मीडियावरही ती ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. 
 सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती. सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty shares childhood photo with father on fathers day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app