सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. सर्वोच्च न्यायालयाने रियाला 'अंतरिम संरक्षण' देण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिला चौकशीसाठी बोलवले आहे. यापूर्वी रियाने तिचं घर सोडून आपल्या कुटूंबासह फरार झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती काही दिवस  गुप्त ठिकाणी थांबली होती. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार रिया आपल्या मुंबईतल्या घरी परतली आहे.

ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला समन्स जारी केले होते. 7 ऑगस्टला शुक्रवारी रियाला ईडीसमोर हजर राहायचे आहे.  बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे ईडीने गेल्या आठवड्यात रिया आणि त्याच्या साथीदारांविरूद्ध मनी लॉन्ड्रिंगचा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. ईडी सुशांत प्रकरणाचा तपास सतत्याने करते आहे.


ईडीने अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि  एक्सगर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात घेतले आहेत. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे.  सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढल्याच्या आरोपावरून ईडी तपास करीत आहे. यात सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांचा जबाब नोंद केला आहे.  सुशांतसिंह राजपूत आणि त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटही तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea chakraborty returns to mumbai flat after ed summons is issued for sushant singh rajput case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.