रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 10:25 AM2020-09-07T10:25:03+5:302020-09-07T10:25:58+5:30

सोशल डिस्टन्सिंग जाए भाड में... अशा शब्दांत अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने संताप बोलून दाखवला.

Rhea Chakraborty gets mobbed as she arrives at NCB office; Richa Chadha and Hansal Mehta slam media for not maintaining social distancing | रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप

रिया चक्रवर्तीला धक्काबुक्की, बॉलिवूडकर भडकले; तापसी, स्वरा, ऋचाने असा व्यक्त केला संताप

googlenewsNext
ठळक मुद्देरिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता ड्रग्ज अँगलही समोर आला आहे. 

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) समन्स बजावल्यानंतर रिया चक्रवर्ती रविवारी एनसीबीच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी तिथे हजर मीडियाने रियाला घेराव घातला. या गर्दीतून रियाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एकीकडे पोलिसांना मोठ्या दिव्यातून जावे लागले. दुसरीकडे मीडियाने कोरोना व्हायरसचे सर्व कायदे बाजूला ठेवून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला. आता यावर प्रचंड टीका होतेय. अभिनेत्री तापसी पन्नू, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, अनुभव सिन्हा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मीडियावर टीकास्त्र सोडले.
रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंग राजपूतला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आता ड्रग्ज अँगलही समोर आला आहे. यानंतर एनसीबीने रियाला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. रिया या चौकशीसाठी पोहोचताच गर्दीतून वाट काढताना तिला धक्काबुक्की सहन करावी लागली. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला.

तापसी पन्नूने यावर तीव्र संताप व्यक्त केला. ‘न्यायाच्या नावावर या लोकांनी एका व्यक्तिचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे. ते सुद्धा ती दोषी सिद्ध होण्याआधी़ मी प्रार्थना करते की, या सर्वांना त्यांच्या कर्माचे फळ मिळो,’ असे ट्विट तापसी पन्नूने केले.

स्वरा भास्कर म्हणाली, लज्जास्पद

स्वरा भास्करने या घटनेवर नाराजी व्यक्त करत ट्विट केले. ‘भारतात लोक इतके खालच्या स्तराला गेलेत. लाजीरवाणे, दु:खद,’ असे तिने लिहिले. अर्थात या ट्विटनंतर स्वरा भास्करही प्रचंड ट्रोल झाली.

अनुभव सिन्हाही संतापले़

दिग्दर्शक अनुभव सिन्हाही रियासोबत झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेनंतर भडकले. ‘एनसीबी कार्यालयातील रिया चक्रवर्तीचा व्हिडीओ दर्शवतो की, मुंबईत मीडिया कायद्यापेक्षा मोठा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

ऋचा चड्ढा म्हणाली,

सोशल डिस्टन्सिंग जाए भाड में... अशा शब्दांत अभिनेत्री ऋचा चड्ढा हिने संताप बोलून दाखवला.

Web Title: Rhea Chakraborty gets mobbed as she arrives at NCB office; Richa Chadha and Hansal Mehta slam media for not maintaining social distancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.