rhea chakraborty to file a defamation case against late sushant singh rajput ex-girlfriends ankita lokhande | रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती?

रिपोर्ट्स : अंकिता लोखंडेला कोर्टात खेचणार रिया चक्रवर्ती?

ठळक मुद्दे सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर सुरु झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात अडकलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती जामीनावर तुरुंगातून बाहेर आली आहे. तुुरुंगातून बाहेर येताच, रिया आता सुशांतची एक्स-गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडेविरोधात कायदेशीर कारवाई करू शकते, असे मानले जात आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, रिया अंकिताविरोधात लीगल अ‍ॅक्शन घेऊ शकते. केवळ इतकेच नाही सुशांत प्रकरणात बयानबाजी करणा-या अन्य काही लोकांविरोधातही ती कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अद्याप रिया व तिच्या वकीलाने याबद्दल कुठलेही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र याआधी रियाच्या वकीलांनी याबद्दलचे संकेत दिले होते. रियाला बदनाम करणा-यांविरूद्ध लवकरच कायदेशीर कारवाई केली जाईल, असे रियाच्या वकीलांनी म्हटले होते.

सुशांत प्रकरणावर अंकिता लोखंडे अनेकदा बोलली. सुशांत डिप्रेशनमध्ये होता, हा दावाही तिने खोडून काढला होता. यादरम्यान रिया चक्रवर्तीवरही तिने थेटपणे निशाणा साधला होता. यानंतर रियानेही अंकिताच्या आरोपांना उत्तर देत, तिला खरीखोटी सुनावली होती. 

अंकिताने केले होते हे ट्वीट
सुशांतचे वडील केके सिंग यांच्या एफआयआरनंतर अंकिताने तिचा पाठिंबा सुशांतच्या घरच्यांना दिला होता. रियाला अटक झाल्यावर ‘यालाच कर्म म्हणतात,’ असे उपरोधिक ट्वीट अंकिताने केले होते. शिवाय इतके प्रेम होते तर त्याला ड्रग्ज कसे घेऊ दिले? असा सवालही अंकिताने रियाला उद्देशून केला होता. जी व्यक्ती हा दावा करत असेल की, ती एखाद्यावर खूप प्रेम करते.  अशात ती व्यक्ती प्रिय व्यक्तीची मेंटल हेल्थ माहीत असूनही त्याला ड्रग्स कसे देणार? तुम्ही असे करणार का? मला नाही वाटत की, असे कोणी करेल. मग याला बेजबाबदारपणा आणि निष्काळजीपणा का म्हणू नये,  असा प्रश्नही अंकिताने विचारला होता.

 सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी

सुशांत आणि अंकिताची लव्हस्टोरी ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवर सुरु झाली होती. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना देखील आवडली होती.सुशांत आणि अंकिता एकमेकांसोबत खूप खूश होते आणि ते दोघेही लग्न करणार होते. मात्र अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आली होती.  सुशांत आणि अंकिता यांनी ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेनंतर ‘झलक दिखला जा’ या रिएलिटी डान्स शोमध्ये भाग घेतला होता. या शोमध्ये त्याने अंकिताला सर्वांसमोर प्रपोज केले होते. 2016 साली ते दोघे लग्न करणार होते. मात्र याच वर्षी सुशांत आणि अंकिता विभक्त झाले होते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty to file a defamation case against late sushant singh rajput ex-girlfriends ankita lokhande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.