अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांचा आगामी चित्रपट चेहरेचे नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यासोबत चित्रपटाच्या टीझरची रिलीज डेटचीदेखील घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या पोस्टर किंवा टॅग लिस्टमध्ये कुठेच रिया चक्रवर्तीचे नाव दिसले नाही. इमरान हाश्मीने ट्विटरवर चेहरेचे नवीन पोस्टर शेअर करत कलाकार आणि क्रू मेंबरचे नाव टॅग केले. या टॅगमध्ये रियाचे नाव कुठेच दिसले नाही. 


अभिनेता इमरान हाश्मीने चेहरे चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर डेट शेअर करत लिहिले की, 'चंद चेहरे, हजारों राज, हर चेहरा कुछ कहता है और बहुत कुछ छुपाता है. ३० एप्रिल, २०२१ला या चेहऱ्या मागचे सत्य जाणून घ्या. चेहरे टीझर ११ मार्चला रिलीज केला जाणार आहे.


या ट्विटमध्ये इमरान हाश्मीने अमिताभ बच्चन, क्रिस्टल डिसूझा, रुमी जाफरी, आनंद पंडित, सिद्धांत कपूर, अनु कपूर, रघुबीर यादव, धृतीमना चटर्जीसोबत सरस्वती फिल्म्स आणि एपीएम पिक्चर्सला टॅग केले आहे. या टॅग केलेल्या लिस्टमध्ये कुठे रिया चक्रवर्तीचा उल्लेख नाही. 


तसेच अमिताभ बच्चन यांनी देखील चेहरेचे पोस्टर आणि टीझरची डेट अनाउंसमेंट करत कास्ट अँड क्रूला टॅग केले आहे. त्यांनी देखील रिया चक्रवर्तीला टॅग केले नाही. दरम्यान अद्याप हे समजू शकलेले नाही की रियाला मेन्शन करायचे नाही, हे चित्रपटाची काही योजना आहे की खरेच रिया चित्रपटात नाही.


रिया चक्रवर्तीने दोन वर्षांपूर्वी जुलै, २०१९मध्ये रुमी जाफरीच्या हा चित्रपट चेहरेमधील आपला लूक शेअर केला होता. तिने पोस्ट शेअर करत लिहिले होते की,   'चेहरे बहुत देखे मगर आज देखा अपना चेहरा...आंखों में सवाल बहुत से, जहन पे सोच का पहरा'. त्यावेळी तिच्या टॅग लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी, रुमी जाफरी, आनंद पंडित, अनु कपूर, कृति खरबंदा, सिद्धांत कपूर, रघुबीर यादव यांच्या नावाचा समावेश होता. आता चित्रपटात क्रिती आणि रिया चक्रवर्ती नाही तर क्रिस्टल डिसूझा पहायला मिळते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rhea Chakraborty dropped from Chehre? New teaser date tweet has no mention of actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.