rhea chakraborty clicked at airport traveling to hyderabad she gets brutally trolled by social media-users |  रिया चक्रवर्तीचा एअरपोर्ट व्हिडीओ पाहून भडकले लोक, केल्या नको त्या कमेंट्स

 रिया चक्रवर्तीचा एअरपोर्ट व्हिडीओ पाहून भडकले लोक, केल्या नको त्या कमेंट्स

ठळक मुद्देसुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. पण हळूहळू तिचे आयुष्य पूर्वपदावर येताना दिसतेय.

रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) एअरपोर्टवर दिसली आणि लोकांनी पुन्हा एकदा अतिशय वाईट पद्धतीने रियाला ट्रोल करणे सुरु केले. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती कायम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. रियाचा फोटो वा व्हिडीओ दिसला रे दिसला की, सुशांतचे चाहते अ‍ॅग्रेसिव्ह होतात आणि रागाच्या भरात नको ते कमेंट्स करतात. (Rhea Chakraborty clicked at airport)
आत्ताही तेच़ रिया एअरपोर्टवर दिसली आणि सुशांतच्या चाहत्यांचा राग अनावर झाला़ ती बेलवर आहे, शहर सोडून कशी जाऊ शकते? असा सवाल एका युजरने केला. तर अन्य एका युजरने यापुढे जात, अतिशय वाईट पद्धतीने रियाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. आता कुणाच्या पैशावर जातेय मॅडम? असा सवाल या युजरने केला.

एअरपोर्टवर रिया अतिशय सिंपल लूकमध्ये दिसली़ यावेळी मीडियाने तिला पोज देण्याची विनंती केली. पण ती न थांबता पुढे गेली.
सुशांतच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबीयांनी रियाला जबाबदार ठरवत, तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
यानंतर सुशांतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात रिया व तिच्या भावाचे नाव आले होते. याप्रकरणी रिया व शौविक दोघांनाही एनसीबीने अटक केली होती.

सुमारे महिनाभर रिया तुरुंगात राहिली. तुरुंगातून बाहेर आल्यापासून रिया कुठेही दिसली नाही. पण हळूहळू तिचे आयुष्य पूर्वपदावर येताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावरही ब-यापैकी अ‍ॅक्टिव्ह झालेली पाहायला मिळतेय. अर्थात आजही मीडियाचे कॅमेरे तिच्या घराबाहेर असतात.  
रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच तिचा ‘चेहरे’ हा सिनेमा रिलीज होतोय. या सिनेमात इमरान हाश्मी, अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या प्रमोशनपासून मात्र रियाला दूर ठेवण्यात आले आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty clicked at airport traveling to hyderabad she gets brutally trolled by social media-users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.