ठळक मुद्देसुशांत सिंग राजपूत केस मध्ये ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, सुशांतचा स्टाफ सॅम्युअल मिरांडा यांना एनसीबीने अटक केलीय. रिया चक्रवर्ती 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. सुशांत ड्रग्ज घ्यायचा, आपला ड्रग्जशी काहीही संबंध नाही, असं रिया चक्रवर्ती वारंवार सांगत होती. मात्र नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीनंतर अखेर रियाने तिचे ड्रग्ज कनेक्शन असल्याची कबुली दिली. इतकेच नाही तर ड्रग्ज प्रकरणातबॉलिवूडच्या काही बड्या स्टार्सच्या नावाचाही खुलासा केला.

एका टॉप फिल्ममेकरचे नाव?
सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार, एनसीबीने केलेल्या चौकशीत रियाने एका दिग्गज दिग्दर्शकाचे नाव घेतले आहे. रियाच्या दाव्यानुसार, याच दिग्दर्शकाने सुशांतला ड्रग्जचे व्यसन लावले. हा दिग्दर्शक सुशांतला पार्टीमध्ये घेऊन जायचा आणि तेथे कोकेन, एलएसडी आणि गांजाचे सेवन व्हायचे. सीएनएन न्यूज18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. रियासोबत रिलेशनशिपमध्ये असताना सुशांतने स्वत: तिला या बड्या दिग्दर्शकाबद्दल सांगितले होते.

रियाने घेतले या दोन अभिनेत्यांची नावे
रियाने आपल्या कबुलीजबाबात अनेकांसोबत दोन पॉवरफुल व फेमस अशा दोन अभिनेत्यांच्या नावाचाही खुलासा केला आहे. या अभिनेत्यांनी सुशांतला ड्रग्ज दिले होते. सुशांतचे लोणावळा येथील फार्महाऊस बॉलिवूड फ्रेन्डच्या ड्रग्ज पार्टीसाठीच होते, असेही रियाने सांगितल्याचे कळते.

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

Shocking!! 13 जूनच्या रात्री ‘डार्क वेब’द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट?

रिया म्हणते, मी या पार्टीला कधीही गेले नाही
रियाच्या दाव्यानुसार, सुशांतच्या लोणावळ्यातील ड्रग्ज पार्टीत ती कधीही गेली नव्हती. मात्र या पार्टीत काही कलाकार तेथे हजर लोकांना ड्रग्ज द्यायचे. रियाने ड्रग्जशी संबध असलेल्या 25 बॉलिवूड कलाकारांचीही नावे घेतली आहे. यात सारा अली खान, रकुल प्रीत सिंग आणि सिमोन खंबाटा यांची नावे असल्याची चर्चा आहे.

सुशांतच्या घरून रियाने स्वत:च्या घरी कुरिअर केला होता अर्धा किलो गांजा

सुशांत सिंग राजपूत केस मध्ये ड्रग चॅट समोर आल्यानंतर एनसीबीचा तपासही महत्वाचा ठरत आहे. एनसीबीला त्यांच्या तपासात आढळून आले की, लॉकडाऊन दरम्यान सुशांत सिंग राजपूतचा काही दिवस रिया चक्रवर्तीच्या घरी घालवायचे होते. यासाठी रिया आणि सुशांतने निर्णय घेतला की, एका फास्ट डिलिव्हरी कुरिअर कंपनीच्या माध्यमातून गांजा रियाच्या घरी पाठवला जावा. चौकशीतून ही बाब कन्फर्म झाली आहे.
एका रिपोर्टनुसार, एनसीबीच्या चौकशीत रिया चक्रवर्ती, शौविक आणि इतरांच्या जबाबातून समजले की, सुशांत आणि रियानने घरच्या काही सामानासोबत एका बॉक्समध्ये जवळपास अर्धा किलो गांजा एप्रिल महिन्यात रियाच्या घरी पाठवला होता. तपासातून असेही समोर आले की, हे काम सुशांतकडे काम करणा-या दीपेश सावंतने केले होते़ त्याने कुरिअर कंपनीला हे सामान रियाच्या सांताक्रूज येथील फ्लॅटवर डिलिव्हर करण्यास सांगितले होते़ रियाच्या घरी हे गांजाचे पॅकेट शौविकने रिसीव्ह केले होते़

Read in English

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: rhea chakraborty claims sushant singh rajput became drug addict because of a top filmmaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.