रवींद्र मोरे

देशभक्तिवर आधारित चित्रपटांची बॉलिवूडमध्ये नेहमी क्रेझ राहिली आहे. विशेष म्हणजे अशा चित्रपटांना प्रेक्षकांनीही मोठी दाद दिली आहे. हे चित्रपट पाहून मनात देशप्रेमाच्या भावना जागल्याशिवाय राहत नाही. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया ज्यांच्यात देशप्रेम बघावयास मिळाले आहे.  

बॉर्डर 
१९९७ मध्ये रिलीज झालेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना यांसारखे दिग्गज कलाकार होते. या मल्टीस्टारर चित्रपटाचे दिग्दर्शन जेपी दत्ता यांनी केले होते. हा चित्रपट भारत आणि पाकिस्तान दरम्यान १९७१ मध्ये झालेल्या युद्धावर आधारित होता. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाºया या चित्रपटाने तीन नॅशनल अवॉर्ड जिंकले होते.  

एलओसी: कारगिल 
२००३ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात संजय दत्त, अजय देवगन, सैफ अली खान, करिना कपूर, रानी मुखर्जी, सुनील शेट्टी, संजय कपूर, अभिषेक बच्चन आणि अक्षय खन्ना यासारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली होती.  जेपी दत्ता दिग्दर्शित हा चित्रपट कारगिल युद्धाशी प्रेरित होता. 

रंग दे बसंती
तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आलेल्या या चित्रपटातील प्रत्येक भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. चित्रपटात आमिर खान, कुणाल कपूर, सोहा अली खान, सिद्धार्थ, आर माधवन, शरमन जोशी आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत होते. यास राकेश ओम प्रकाश मेहराने दिग्दर्शित केले होते. हा चित्रपट त्यावेळचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.  

उरी: द सर्जिकल स्ट्राइक 
जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये स्थित भारतीय सेनेच्या स्थानिय मुख्यालयावर आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्लयात सुमारे १८ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या ११ दिवसानंतर भारतीय सेनेने पाकिस्तानात घुसून  सर्जिकल स्ट्राइक केला होता आणि आतंकवाद्यांच्या बºयाच ठिकाणांना नेस्तनाबूत केले होते. या घटनेवर दिग्दर्शक आदित्य धरने 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपट बनविला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. यात विक्की कौशल, यामी गौतम, परेश रावल आदी दिग्गज कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती.  

परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण 
जॉन अब्राहमने २०१८ मध्ये 'परमाणु: द स्टोरी ऑफ पोखरण' द्वारा भारतीय इतिहासाच्या गौरवान्वित क्षणांना पडद्यावर दाखविले. १९९८ मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय दबावाला बळी न पडता परमाणू शक्ती हस्तगत केली होती. हा चित्रपट याच घटनेवर आधारित आहे. चित्रपटात जॉन अब्राहमने एका आयएएस अधिकाºयाची भूमिका साकारली आहे.  

सत्यमेव जयते  
२०१८ मध्येच रिलीज झालेल्या या चित्रपटात जॉन अब्राहम आणि मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात जॉनने अशा व्यक्तीची भूमिका साकारली आहे, जो समाजाचे शत्रू बनलेल्या एक-एक पोलिसाची हत्या करतो. चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप झवेरीने केले आहे.

Web Title: Republic Day 2020: Patriotic movies of bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.