अनेक अभिनेत्री चंदेरी दुनियापासून दूर गेल्या आणि संसारात रमल्या. आपल्याला हव्या तशा भूमिका साकारायच्या तसे सिनेमा बनत नसल्याने सिनेसृष्टीपासून दूर जात संसारात रमणा-या अभिनेत्रींची यादी तशी मोठीच आहे. तसे करिअरमध्ये आलेल्या अपयशामुळे बॉलिवूडपासून दूर गेलेली अभिनेत्री  ट्युलिप जोशीही चर्चेत आली आहे. 

2003 मध्ये आलेल्या 'मातृभूमी' या वादग्रस्त सिनेमात ट्युलिप जोशी झळकली होती. ट्युलिपने 2002 मध्ये यशराज बॅनरच्या 'मेरे यार की शादी है' या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.  त्यानंतर 2003 मध्ये ती 'विलेन' या तेलगू आणि 'मातृभूमी' या हिंदी सिनेमात झळकली होती. मातृभूमी सिनेमा फारसा गाजला नव्हता, मात्र तिच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.   दरम्यान ट्युलिपला कॅप्टन विनोद नायरवर प्रेम जडलं.

विनोद प्रसिद्ध कादंबरीकार 'प्राइड ऑफ लॉयन्स'चे लेखक असून तो यशस्वी बिझनेसमॅनदेखील आहे. विनोद १९८९ पासून १९९५ पर्यंत भारतीय लष्करात होते.दोघे जवळपास ४ वर्षे लिव इन रिलेशीपमध्ये राहिले होते. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ट्युलिप नवरा विनोद नायरसोबत त्यांचा कोटीचा बिझनेस सांभाळते आहे. ट्युलिप आता नव-याची 600 कोटींच्या कंपनीचे काम सांभाळत असून ती कंपनीची डायरेक्टर आहे. 

 

2000 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर ट्युलिप अभिनयाकडे वळली. दिसायला सुंदर असल्यामुळे तिला जाहिराती आणि सिनेमांमध्ये काम मिळाले. चंदेरी दुनियेपासून दूर जात एका वेगळ्याच कामात व्यग्र राहून तिचे मॅरिड लाईफही एन्जॉय करत आहे.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remember Tulip Joshi? didn't make it big in Bollywood but is still one of the richest in the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.