ठळक मुद्दे2014 मध्ये  जुगलने त्याची एनआरआय गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्न केले.  लग्नाचा हा सोहळा अत्यंत खासगी होता.

पापा कहते है आणि मोहब्बतें सारख्या चित्रपटात दिसलेला अभिनेता जुगल हंसराज आठवतो? एकेकाळी या जुगलवर देशभरातील तरूणी फिदा होत्या. ‘घर से निकलतें ही’ या त्याच्या गाण्याने अशी काही क्रेज निर्माण केली की, तो एका रात्रीत प्रकाशझोतात आला. मात्र अगदी तसाच अचानक मोठ्या पडद्यावर दिसेनासा झाला. हा  जुगल पुन्हा एकदा चर्चेत आहे. होय, जुगलने पत्नी व मुलांसोबत काही फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला.
केसांचा रंग बदलून पांढरा झाला असला तरी त्याच्या चेह-यावरचा चार्म कायम आहे. त्यामुळेच त्याचे हे फोटो पाहून नेटकरी सैराट झालेत. जुगल पांढरे केस तुझ्यावर खूप छान दिसतात, असे लिहित एका युजरने त्याची प्रशंसा केली. इतक्या वर्षानंतर जुगलला पाहून अनेकांनी आनंद व्यक्त केला.


 

1983 मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून फिल्मी करिअर सुरु करणा-या जुगलने 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आ गले लग जा’  या चित्रपटातून   हिरो म्हणून डेब्यू केला. चॉकलेटी बॉय म्हणून ओळखल्या जाणा-या जुगलचा हा पहिला सिनेमा होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप झाला.  यानंतर 1996 मध्ये ‘पापा कहते है’मध्ये तो झळकला. या चित्रपटातील  घर से निकल ते ही..., हे गाणे तुफान हिट झाले आणि जुगल सगळ्यांच्या डोळ्यात भरला. पण जुगलला खरी ओळख दिली ती ‘मोहब्बतें’ या चित्रपटाने. या चित्रपटाने तो एका रात्रीत स्टार बनला. पण हे स्टारडम फारकाळ टिकले नाही. यानंतरचा एकही चित्रपट त्यानंतर हिट ठरला नाही. त्यामुळे त्याचे करिअर जवळपास संपुष्टात आले. 2010 मध्ये ‘प्यार इम्पॉसिबल’ हा जुगलचा अखेरचा चित्रपट होता.

हिरो म्हणून अपयशी ठरल्यावर करण जोहरने जुगलला मदतीचा हात दिला. फार कमी लोकांना ठाऊक असेल की, शाहरूख व काजोलच्या ‘कुछ कुछ होता है’ या सुपरडुपर हिट सिनेमाच्या टायटल सॉन्गच्या पहिल्या 8 ओळी जुगलने लिहिल्या होत्या.  करण आणि जुगल एकदा नाईट आऊटला सोबत गेले होते, त्यावेळी त्यांनी हे गाणे लिहिले होते.  नंतर या गाण्यावर काम झाले आणि ते चित्रपटाचे टायटल ट्रॅक बनले.


जुगल सध्या करण जोहरच्या धर्मा या प्रॉडक्शन हाऊसमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम करतो. स्क्रिप्ट सिलेक्शन आणि स्क्रिप्ट डेव्हलपेंटचे काम तो करतो.


2014 मध्ये  जुगलने त्याची एनआरआय गर्लफ्रेंड जास्मिनसोबत लग्न केले.  लग्नाचा हा सोहळा अत्यंत खासगी होता. जुगलच्या एका मित्राने ट्विटरवर माहिती शेअर केली, तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना समजले होते. जुगलची पत्नी जास्मिन जास्मिन न्यूयॉर्कमध्ये इनव्हेस्टमेंट बँकर आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Remember Jugal Hansraj? The Mohabbatein actor grey-hair look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.