रेखा यांच्या नवऱ्यानं लग्नाच्या ७ महिन्यानंतर केलं होतं सुसाईड, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 09:00 PM2019-09-08T21:00:00+5:302019-09-08T21:00:00+5:30

१९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या ७ वर्षानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

Rekha’s husband Mukesh Agarwal committed suicide in 1990 | रेखा यांच्या नवऱ्यानं लग्नाच्या ७ महिन्यानंतर केलं होतं सुसाईड, हे आहे यामागचं कारण

रेखा यांच्या नवऱ्यानं लग्नाच्या ७ महिन्यानंतर केलं होतं सुसाईड, हे आहे यामागचं कारण

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये ८०च्या दशकातील प्रसिद्ध व सुंदर अभिनेत्री रेखा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही त्या त्यांच्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करत असतात. १९९० साली रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या ७ वर्षानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली होती.

पंजाब केसरीच्या रिपोर्टनुसार, रेखा यांच्या या लग्नाबाबत असं बोललं जातं की, त्यांना हे लग्न आवडलं नव्हतं आणि रेखा लग्नानंतर काही दिवस मुकेश यांच्यापासून लांब राहू लागली होती. मुकेश यांनी रेखा यांच्याकडे जाण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. त्यामुळे ते डिप्रेशनमध्ये गेलं आणि त्यांच्या परिस्थितीला वैतागून त्यांनी लग्नाच्या ७ महिन्यानंतर आत्महत्येचा मार्ग अवलंबला. रेखा आणि मुकेश यांचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी रेखा यांचं वय ३५ वर्षे आणि मुकेश यांचं वय ३७ वर्षे होते. एका कॉमन फ्रेंडमुळे त्यांची ओळख झाली होती.


मुकेश यांना रेखा पहिल्याच भेटीत आवडल्या होत्या आणि त्यावेळी त्यांनी रेखा यांच्यासोबत लग्न करायचं ठरवलं होतं. त्यानंतर त्यांनी रेखाला प्रपोझ केलं आणि लग्नही झालं. मुकेश यांनी लग्नानंतर रेखा यांना सांगितलं होतं की, आपल्या लग्नाबद्दल सिनेइंडस्ट्रीतील फ्रेंड्सना सांगितलं पाहिजे. मात्र रेखा अजिबात तयार नव्हत्या. मुकेश यांनी त्यांचे तीन मित्र अकबर खान, संजय खान व हेमा मालिनी यांना भेटण्याबद्दल सांगितलं होतं. त्यानंतर रेखा व मुकेश हे दोघं एकत्र हेमा मालिनी व धर्मेंद्र यांच्या घरी गेले होते.

तिथे हेमा मालिनी यांनी रेखा व मुकेश यांना एकत्र पाहून म्हटलं होतं की, आता हे नको सांगूस की तू या माणसासोबत लग्न केलं आहेस? त्यावर रेखा यांनी हो सांगितलं. मग हेमा मालिनी म्हणाल्या की, हे श्रीमंत आहेत का? त्यावर रेखा यांनी काहीही उत्तर दिलं नाही.


रेखा अभिनेते अमिताभ बच्चन यांची दीवानी होती. हे त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, जेव्हा अमिताभ बच्चन यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा त्यांची दीवानी झाली होती. त्यानंतर दोघांनी जवळपास १० चित्रपटात एकत्र काम केलं होतं.

असंही बोललं जातं की, सिलसिला चित्रपट रेखा व अमिताभ बच्चन यांच्या नात्यावर आधारीत आहे. 

Web Title: Rekha’s husband Mukesh Agarwal committed suicide in 1990

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.