बॉलिवूडची एव्हरग्रीन ब्युटी रेखा नेहमी त्यांच्या कपडे व फॅशनमुळे चर्चेत येत असतात. त्या कोणत्याही इव्हेंटमध्ये त्यांच्या आऊटफिट व सौंदर्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतात. नेहमी कांझीवरम साडीत दिसणाऱ्या रेखा यावेळी एका वेगळ्या लूकमध्ये पहायला मिळाल्या.


नुकतेच रेखा फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या स्टोअरमध्ये गेल्या होत्या. यावेळी रेखा यांनी साडी नेसली नव्हती. त्यांनी रेशमी कफ्तान परिधान केलं होतं. व्हाईट रंगाच्या कफ्तानसोबत त्यांनी मॅचिंग ओढणी घेतली होती. त्यांनी नॉट हेअरबॅण्ड घालून त्यांच्या लूकला चारचाँद लावले होते. त्यांचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला. ते त्यांच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


एका युजरनं तर रेखा यांची तुलना दीपिका पादुकोणसोबत केली आणि लिहिलं की, एकदम दीपिका पादुकोण सारखी दिसत आहात.


तर दुसऱ्या एका युजरनं रेखा यांच्या सौंदर्यांची प्रशंसा केली. एकाने म्हटलं की, या रेखाजी आहेत? तर दुसऱ्या एका व्यक्तीनं त्यांना एव्हरग्रीन ब्युटी तर आणखीन एका युजरनं दिवा म्हटलं.


नुकतेच गणेश चतुर्थीच्या निमित्तानं अंबानी कुटुंबानं मुंबईतील अँटीलिया येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रेखा यांनी हजेरी लावली होती.

त्यावेळी त्यांनी गोल्डन आणि पर्पल रंगाच्या साडीसोबत हेवी ज्वेलरी कॅरी केली होती. त्यावेळी देखील त्यांच्या सौंदर्यानं सर्वांना चांगलीच भुरळ पाडली होती.

 

Web Title: Rekha's beauty still beautifully collides with actresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.