ठळक मुद्देरेखा यांच्याप्रमाणे राधा यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण लग्नानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला.

बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री रेखा कायम त्यांच्या फॅशन व स्टाईलमुळे चर्चेत असतात. चित्रपटांपासून दूर असल्या तरी सोशल मीडियावरच्या त्यांच्या फोटोंचीही चर्चा रंगते. रेखा स्वत: सोशल मीडियावर नाहीत. पण बॉलिवूडच्या अनेक इव्हेंटमध्ये त्या दिसतात आणि या इव्हेंटचे फोटो क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. 
होय, रेखा यांनी नुकतीच रिक्कू राकेश नाथ यांची मुलगी दक्षिणा नाथ हिच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली. मुंबईत पार पडलेल्या या रिसेप्शनमध्ये रेखा आल्यात आणि मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेलेत. यावेळी रेखासोबत दिसलेल्या आणखी एका चेह-यानेही मीडियाचे लक्ष वेधून घेतले. हा चेहरा होता रेखा यांची बहीण राधा हिचा.  राधा ही रेखा यांची लहान बहीण आहे. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय. 


व्हिडीओत रेखा राधाच्या गालाचे प्रेमाने चुंबन घेताना दिसत आहेत. या व्हिडीओचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे, राधाची रेखा यांच्यासारखी स्टाईल.

होय, राधाने यावेळी ग्रीन कलरचा लॉन्ग सूट घातला होता. सोबत केसांचा उंच बन आणि त्यावर गजरा माळला होता. कानात मोठे ईअररिंग्स आणि माथ्यावर बिंदी असा तिचा अवतार होता. रेखा व राधा यांची स्टाईल एकदम सारखी होती. साहजिकच या दोघींची स्टाईल चर्चेचा विषय ठरली.
रेखा यांच्याप्रमाणे राधा यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण लग्नानंतर त्यांनी अभिनयक्षेत्राला रामराम ठोकला. गेल्या काही वर्षांपासून त्या अमेरिकेत आपल्या पतीसोबत राहात आहेत. 

याआधी अरमान जैनच्या रिसेप्शनमध्येही रेखा व राधा एकत्र दिसल्या होत्या.

Web Title: Rekha & sister Radha make heads turn in their traditional looks at a wedding reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.