अभिनेत्री यामी गौतम हिने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. यावर्षाची तिची सुरूवात जोशने झाली असून आदित्य धरच्या 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपटातील तिच्या अभिनयाचे सगळीकडे खूप कौतूक झाले. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आता यामी 'बाला' चित्रपटात झळकणार आहे. यामीने नुकतेच सोशल मीडियावर तिच्या बालपणीचा फोटो शेअर केला आहे.

यामी गौतम हिने इंस्टाग्रामवर तिच्या बालपणीचा फोटो शेअर करून म्हटले की,'डिंपल आणि चीक्स. बालपणीच्या आठवणींना उजाळा.' 


हिंदुस्तान डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, प्रत्येक कलाकार प्रत्येक चित्रपटात विविध भूमिका साकारीत असतात. आम्ही जे सिनेमे करतो. त्यातून तुम्हाला समजू शकते की आम्ही काय आहोत आणि आम्ही काय करण्यासाठी योग्य आहोत. काही चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करण्याचे आणि काही चॅलेंजिंग भूमिका निभावण्याचे भाग्य मला प्राप्त झाले आहे.


तिने पुढे सांगितले की, ''उरी' चित्रपटानंतर मला लोकांनी नव्या अवतारात पाहिले आहे आणि ही एका कलाकारांसाठी चांगली बाब आहे. उरीमधील भूमिकेमुळेच मला बाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.'


'बाला' या चित्रपटामध्ये आयुष्यमानने एका टक्कल असलेल्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. कमी वयात ओढावलेले अकाली टक्कलेपणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीरेखेभोवती या चित्रपटाची कथा फिरताना दिसून येणार आहे.

या चित्रपटात आयुषमान खुराना व भूमी पेडणेकर यांच्यासोबत यामी गौतम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात यामी लखनऊमधील एक सुपर मॉडेलच्या भूमिकेत दिसणार आहे.

बाला चित्रपटात यामीला एका वेगळ्या भूमिकेत पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Recognize this Bollywood's Dimple girl, today is the beating of millions of hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.