ठळक मुद्देमाझे वडील आणि सलमान सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे. मी त्यावेळी मस्तपैकी झोपलेली असायचे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले होते.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमान ऐश्वर्याच्या नव्हे तर या अभिनेत्रीशी घरी रात्री अपरात्री जायचा. सलमान या अभिनेत्रीच्या घरी अनेकवेळा जात असल्याने त्याच्या आणि त्या अभिनेत्रीच्या अफेअरच्या चर्चांना देखील ऊत आले होते. या अभिनेत्रीनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. 

शिल्पा शेट्टी आणि सलमान खान यांनी औजार, गर्वः प्राईज अँड ऑनर, फिर मिलेंगे, शादी कर के फंस गया यार यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक स्टेज शो मध्ये देखील ते एकत्र थिरकताना दिसले आहेत. ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सलमान आणि शिल्पाचे अफेअर असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी मीडियात रंगली होती. या दोघांच्या अफेअरची चर्चा होण्यामागे एक खास कारण होते.

शिल्पाला तिच्या एका मुलाखतीच्या दरम्यान सलमान खान आणि तिच्या नात्याविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी शिल्पाने सांगितले होते की, आम्ही दोघे खूप चांगले फ्रेंड्स आहोत. पण त्याशिवाय आमच्या दोघांमध्ये काहीही नाते नाहीये. आम्ही कधी अनेक वर्षं एकमेकांना ओळखत असलो तरी आम्ही कधी डेटवर देखील गेलो नाही. सलमान हा खूपच चांगला असून त्याचे माझ्यासोबतच नव्हे तर माझ्या कुटुंबियांसोबत देखील खूपच चांगले संबंध आहेत. त्याची माझ्याप्रमाणेच माझ्या वडिलांसोबत खूपच चांगली मैत्री होती. तो अनेकवेळा मध्यरात्री माझ्या घरी यायचा. पण तो मला भेटण्यासाठी नव्हे तर माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करायला यायचा. माझे वडील आणि तो सोबत ड्रिंक करायचे आणि कित्येक तास गप्पा मारत बसायचे. मी त्यावेळी मस्तपैकी झोपलेली असायचे. माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याला खूपच वाईट वाटले होते. सलमान आम्हाला घरी भेटायला आला, त्यावेळी खूपच उदास होता. कित्येक मिनिटे तो टेबलावर डोके ठेवून शांत बसला होता.

 

Web Title: This is a reason why salman khan used to visit shilpa shetty home in night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.