ठळक मुद्देसलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. 

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सलमानसाठी तिने हम तुम्हारे है सनम या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. तिला अनेकवेळा सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील पाहायला मिळत असे. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले नाते पसंत नव्हते. नोव्हेंबर 2001 मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गैरवर्तुणूक केली होती असे म्हटले जाते. 

सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच व्यक्तीसोबत आपण सगळ्यात जास्त भांडतो. सलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असे इंडिया टूडेने त्यांच्या वृत्तात म्हटले होते.

हम दिल दे चुके या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले समीर-नंदिनी ही पात्रं आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. सलमान आणि ऐश्वर्या या दोघांची हम दिल दे चुके सनम या चित्रपटातील केमिस्ट्री खूप चांगली जुळून येण्यामागे एक खास कारण होते. कारण या चित्रपटाच्या वेळी त्या दोघांचे अफेअर सुरू असल्याच्या चर्चा मीडियात रंगल्या होत्या. त्यामुळे त्यांची रिअल लाइफमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना रिल लाइफमध्ये देखील पाहायला मिळाली होती. सलमान खान आणि ऐश्वर्या रायच्या जोडीचा त्यावेळी बोलबाला असल्याने त्या दोघांना अनेक चित्रपटात नायक-नायिकेच्या भूमिकेसाठी विचारले जात असे. त्यांनी त्यानंतर देखील काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण त्यांच्या ब्रेकअपनंतर प्रेक्षकांना त्यांना कधीच एकत्र पाहायला मिळाले नाही. 

Web Title: this is the reason for Salman Khan and Aishwarya Rai break up?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.