महिमा चौधरीच्या मुलीचे सौंदर्य पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, लाईमलाइटपासून राहते दुर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 10:53 AM2020-02-29T10:53:23+5:302020-02-29T10:57:03+5:30

अर्याना महिमापेक्षाही दिसायला सुंदर आहे. इतकेच नाही तर तिचा क्युटनेस पाहून इतर स्टारकिडसही तिच्यापुढे फिके पडतील असे तिचे सौंदर्य आहे. 

For This Reason 'Pardes' Fame Actress Mahima Chaudhary Daughter Still Away from the limeligh-SRJ | महिमा चौधरीच्या मुलीचे सौंदर्य पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, लाईमलाइटपासून राहते दुर

महिमा चौधरीच्या मुलीचे सौंदर्य पाहून इतर स्टारकिडसही पडतील फिके, लाईमलाइटपासून राहते दुर

Next

बॉलीवुडमध्ये स्टार किड्सची चर्चा होणं काही नवं नाही. मग सुपरस्टार्सच्या मुला-मुलींची बॉलीवुडमध्ये एंट्री असो किंवा त्यांचं खासगी जीवन. त्यांच्याबाबत प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. या सगळ्या स्टार किड्समध्ये तैमूरपासून ते  सारापर्यंत,  जान्हवीपासून ते अनन्यापर्यंत सारेच स्टारकिड्स सध्या लाईमलाइटमध्ये आहेत. मात्र या सगळ्यांमध्ये परदेस गर्ल महिमा चौधरी चंदेरी दुनियेपासून लांब असली तरीही तिच्या मुलीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.


नेहमीच महिमाने तिचे खाजगी आयुष्य मीडियापासून लांबच ठेवले आहे.मात्र आता सध्या स्टारकिडस लाइमलाइटमध्ये येत असताना तिची मुलगी तरी कसे मागे राहणार. महिमाच्या मुलीचे नाव आहे अर्याना चौधरी. अर्याना हुबेहूब तिची आई महिमासारखी दिसते. महिमाने एका मुलाखतीमध्ये सांगितले कि तिच्या मुलीला मोठे होऊन अभिनेत्री बनायचे आहे. सध्या ती शिकत आहे. अर्याना महिमापेक्षाही दिसायला सुंदर आहे. इतकेच नाही तर तिचा क्युटनेस पाहून इतर स्टारकिडसही तिच्यापुढे फिके पडतील असे तिचे सौंदर्य आहे. 


विशेष म्हणजे २००६ मध्ये महिमाने बॉबी मुखर्जी सोबत लग्न केले. काही कारणामुळे त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. लग्नाच्या अवघ्या ७ वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर महिमा सिंगल मदर बनून मुलीचा सांभाळ करत आहे. 
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For This Reason 'Pardes' Fame Actress Mahima Chaudhary Daughter Still Away from the limeligh-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app