For This Reason Farah Khan Didn't Charge Single Penny For Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara | दिलदार फराह खान ! या कारणामुळे एकही पैसा न घेता कोरोयोग्राफ केले 'दिल बेचारा' सिनेमाचे टायटल साँग, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

दिलदार फराह खान ! या कारणामुळे एकही पैसा न घेता कोरोयोग्राफ केले 'दिल बेचारा' सिनेमाचे टायटल साँग, वाचून तुमचेही डोळे पाणावतील

सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. दिल बेचारा हा सिनेमा २४ जुलैला रसिकांच्या भेटीला येणार आहे. सुशांतचा हा शेवटचा सिनेमा असल्यामुळे त्याचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहात आहे. त्यापूर्वीच सिनेमाचा ट्रेलर आणि टायटल साँग रसिकांच्या भेटीला आले. गाण्याला आणि ट्रेलर रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. हा सिनेमा सिनेसृष्टीतल्या काही कलाकारांसाठीही तसा खासच असणार आहे. 

या गाण्याला फराह खानने कोरोयोग्राफ केले होते. विशेष म्हणजे लाखोंचे मानधन घेणा-या फराह खानने एक पैसा घेतला नव्हता. याविषयी फराहने सांगितले की, या सिनेमाचा दिग्दर्शक मुकेश छाबडाला मी माझ्या भावासारखा मानते. त्यात हा त्याचा पहिला सिनेमा असल्यामुळे त्याच्याकडून पैसे न घेताच मी काम केल्याचे सांगितले. हे रहस्य खुद्द मुकेशनेच सोशल मीडियावर चाहत्यांसह शेअर करत  फराहचे आभार मानले. त्यावेळी फराहनेही याची काही गरज नव्हती मुकेश...लव्ह यु ! असे सांगत आपले कर्तव्य पार पाडले.

हे गाणं आम्ही केवळ एका दिवसात शूट केलं असून सुशांतने एका टेकमध्ये ते पूर्ण केलं होतं. परंतु, त्याबदल्यात त्याने एक अट ठेवली होती. मात्र त्याची ही अट अखेरची ठरली, असं फराहने एका मुलाखतीत सांगितलं.

“हे गाणं माझ्यासाठी अत्यंत जवळच आहे. कारण पहिल्यांदाच मी सुशांतसाठी ते कोरिओग्राफ केलं होतं. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र होतो. परंतु, एकत्र काम करण्याची कधीच संधी मिळाली नव्हती. हे गाणं एका शॉटमध्ये चित्रीत व्हावं अशी माझी इच्छा होती, कारण मला सुशांतवर पूर्ण विश्वास होतो, त्यालाच हे करणं शक्य आहे”, असं फराह म्हणाली.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: For This Reason Farah Khan Didn't Charge Single Penny For Sushant Singh Rajput Last Movie Dil Bechara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.