Ready' actor Mohit Baghel dies of cancer | अभिनेता मोहित बघेलचे निधन, सलमानच्या 'रेडी' सिनेमात साकारली होती भूमिका

अभिनेता मोहित बघेलचे निधन, सलमानच्या 'रेडी' सिनेमात साकारली होती भूमिका

अभिनेता मोहित बघेलचे निधन झाले आहे.  वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी त्याने या जगाचा  निरोप घेतला. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.  इतक्या लहान वायत मोहितने जगाचा निरोप घेतला ही बातमी ऐकताच सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

 2011 मध्ये मोहितने सलमान खानसोबत 'रेड्डी' चित्रपटात छोटे अमर चौधरी ही भूमिका साकारली होती. त्याशिवाय त्याने 'जय हो' या सुपरहिट चित्रपटातही भूमिका साकारत आपली वेगळी ओळख बनवली होती. 

मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.

Web Title: Ready' actor Mohit Baghel dies of cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.