ठळक मुद्देरवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षे होते तर छाया 8 वर्षांची होती.

बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन आजी होणार आहे. आश्चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. रवीनाने अलीकडे मुलगी छाया हिची बेबी शॉवर पार्टी होस्ट केली होती. 
छाया ही रवीनाची दत्तक मुलगी आहे. 1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतले होते. हीच छाया आता आई होणार आहे आणि रवीना आजी. आजी बनणार असल्याने रवीना सध्या जाम खूश आहे.

पूजा मखीजा हिने छायाच्या बेबी शॉवरचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करताना तिने रवीनाला आजी बनणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

‘आजी बनणार असल्याबद्दल चीअर्स... रवीना तू अगदी सच्चेपणाने सगळे काही केलेस. आपल्या दत्तक मुलीचे डोहाळे पुरवताना तू कुठेही चुकली नाहीस. अगदी सगळे काही उत्तमरित्या पार पाडलेस. हे सगळे मनाला भावणारे आहे,’ असे तिने लिहिले.
बेबी शॉवर पार्टीत रवीनाची मुलगी राशा थडानी ही सुद्धा आनंदी दिसली. छाया  मरून कलरच्या ड्रेसमध्ये दिसली तर रवीना प्रिंटेड टॉप आणि ट्राऊजरमध्ये होती.

रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षे होते तर छाया 8 वर्षांची होती. 22 फेबु्रवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. सध्या रवीना ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: raveena tandon host daughter chhaya baby shower see pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.