Raveena Tandon gives a younger sensation with a younger actor! | रवीना टंडनने वयाने लहान असलेल्या 'या' अभिनेत्याबरोबर दिले बोल्ड सीन्स!
रवीना टंडनने वयाने लहान असलेल्या 'या' अभिनेत्याबरोबर दिले बोल्ड सीन्स!
‘मातृ’ या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री रवीना टंडन लवकरच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘शब’ या चित्रपटातून ती पुनरागमन करणार असून, चित्रपटातील तिची भूमिका थक्क करणारी असणार आहे. कारण या चित्रपटात रवीनाने तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्यासोबत अनेक बोल्ड आणि सेक्सी सीन्स दिल्याने प्रेक्षक तिला या अवतारात कितपत पसंत करतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

रवीनाच्या ‘मातृ’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसा करिष्मा दाखविला नव्हता. मात्र अशातही रवीनाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले. आता ती पुन्हा ‘शब’मधून परतणार आहे. या चित्रपटात फॅशन हाउसच्या मालकिनीची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे. चित्रपटात तिने अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या आशीषबरोबर तिने दिलेले इंटिमेंट सीन्स कमालीचे आहेत. हा चित्रपट ३० जून रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक ओनीर यांनी १७ वर्षांपूर्वीच रवीनासोबत चित्रपटाविषयी चर्चा केली होती. त्यावेळी तिला चित्रपटाची स्क्रिप्टही ऐकविली होती. परंतु पर्सनल लाइफमध्ये व्यस्त असलेल्या रवीनाला चित्रपटासाठी वेळ देता आला नव्हता. मात्र यावेळेस रवीनाने चित्रपट पूर्ण केला आहे. चित्रपटात रवीना व्यतिरिक्त अर्पिता चॅटर्जी हिचीही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाला मिथुन यांनी संगीत दिले असून, ‘ओ साथी’ या टायटल सॉँग अर्जित सिंग याने गायिले आहे. आतापर्यंत यु-ट्युबवर हे गाणे ३० लाखांपेक्षा अधिक लोकांनी बघितले आहे. 

चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि मसूरीच्या आसपासच्या परिसरात करण्यात आली आहे. ‘शब’मध्ये लव्ह ट्राई-अ‍ॅँगलबरोबरच दिल्लीची डार्क साइड दाखविण्यात येणार आहे. चित्रपटातील रवीनाच्या भूमिकेविषयी बोलायचे झाल्यास, ती अशा एका महिलेची भूमिका साकारत आहे, जी ग्लॅमरस आणि पैसेवाली आहे. तर आशीष बिष्ट चित्रपटात एका स्ट्रगलरची भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी बोलताना आशीषने म्हटले होते की, रवीनाला जेव्हा तो पहिल्यांदा भेटला होता तेव्हा खूपच नर्व्हस होता. मात्र काही दिवसांनंतर रवीना आणि त्याच्यात चांगलीच मैत्री झाली. तो म्हणतो की, ‘रवीनात मला कधीच स्टारडम दिसला नाही.’Web Title: Raveena Tandon gives a younger sensation with a younger actor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.