बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन अडचणीत सापडली आहे. होय, सुप्रसिद्ध लिंगराज मंदिरात मोबाईलचा वापर करणे रवीनाला महागात पडले आहे. याप्रकरणी लिंगराज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लिंगराज मंदिराच्या प्रशासनाने रवीनाविरोधात एफआयआर दाखल केला आहे. रवीना ‘नो कॅमेरा झोन’मध्ये जाहिरात शूट करत होती, असे तक्रारीत म्हटले गेले आहे. मंदिरातील हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.रविवारी दुपारी रवीना लिंगराज मंदिरात गेली होती. या मंदिरातील तिचे काही फोटोही व्हायरल झाले होते. मंदिराच्या व्यवस्थापन कमिटीचे पदाधिकारी राजीव लोचन परिदा यांनी सांगितले की, सेवाकर्मचाºयांशिवाय अन्य कुणालाही मंदिरात मोबाईल फोन नेण्याची परवानगी नाही. असे असताना रवीना मंदिरात मोबाईल कॅमे-याने जाहिरात शूट करताना दिसली. हे सुरक्षा मापदंडाच्या उल्लंघनाचे प्रकरण आहे. या घटनेने भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. दरम्यान भारतीय पुरातत्त्व विभागानेही याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

रवीनानेही यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. मंदिराच्या आत मोबाईल बॅन आहेत, हे मला ठाऊक नव्हते. त्याठिकाणी माझ्या आजूबाजूच्या सर्वांजवळ मोबाईल होते आणि ते सेल्फी घेत होते. मंदिरात कुणी तरी मला माझ्या फिटनेसचे रहस्य आणि ब्युटी टीप्स विचारल्या. मी सांगत असतानाच कुणीतरी व्हिडिओ बनवला. मी मंदिरात जात असताना पोलिसांनी ना माझी बॅग तपासली, ना मंदिरात मोबाईल बॅन असल्याचे सांगितले. लोकल अ‍ॅथॉरिटीजनेही मला याबाबत माहिती दिली नाही. माझ्या मनात सर्व मंदिरांप्रती आदर आहे. मी अनेक मंदिरांचे दर्शन घेतले आहे. कुणाच्याही भावना दुखावणे वा नियम डावलणे हा माझा उद्देश नव्हता, असे तिने स्पष्ट केले आहे.
लिंगराज मंदिर ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे स्थित आहे. येथील प्राचीन मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर भगवान त्रिभुवनेश्वरास समर्पित आहे. स्थापत्यकला आणि कलाकुसरीसाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे.

ALSO READ : ... आणि आफताब शिवदासानीने रवीना टंडनच्या हातावर उलटी केलीWeb Title: Raveena Tandon, FIR filed by using mobile phone in Lingraj temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.