ठळक मुद्दे1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतले होते. हीच छाया आता आई झाली आणि रवीना आजी.

बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन आजी झाली आहे. रवीनाची मुलगी छाया हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. रवीनाने या नव्या सदस्याचे जोरदार स्वागत केले. या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
रवीनाने स्वत: सोशल मीडियावर ती आजी झाल्याची माहिती शेअर केली केली.  परमेश्वराचे खूप खूप आभार, बाळ घरी आले आहे,असे तिने ही बातमी शेअर करताना लिहिले.

या फोटो रवीनाची मुलगी छाया तिच्या बाळासोबत दिसते आहे. तर रवीना हात जोडून देवाचे आभार मानते आहे.


काहीच दिवसांपूर्वी रवीनाने छायासाठी एक ग्रॅण्ड बेबी शॉवर पार्टी होस्ट केली होती. या बेबी शॉवरचे फोटोही व्हायरल झाले होते.  बेबी शॉवर पार्टीत रवीनाची मुलगी राशा थडानी ही सुद्धा  दिसली होती. छाया  मरून कलरच्या ड्रेसमध्ये दिसली तर रवीना प्रिंटेड टॉप आणि ट्राऊजरमध्ये होती. छाया ही रवीनाची दत्तक मुलगी आहे.

1995 मध्ये रवीनाने छायाला दत्तक घेतले होते. हीच छाया आता आई झाली आणि रवीना आजी. आजी झाल्याने रवीना सध्या जाम खूश आहे.  रवीनाने 1995 मध्ये दोन मुली दत्तक घेतल्या होत्या. छाया आणि पूजा ही त्यांची नावे. त्यावेळी पूजाचे वय 11 वर्षे होते तर छाया 8 वर्षांची होती.

22 फेबु्रवारी 2004 रोजी रवीनाने फिल्म डिस्ट्रीब्युटर अनिल थडानीसेबत लग्न केले. या दोघांना 14 वर्षांची मुलगी राशा आणि 11 वर्षांचा मुलगा आहे. सध्या रवीना ‘नच बलिए’ या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारते आहे.

Web Title: Raveena Tandon becomes grandmother, brings newborn grandchild home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.