ठळक मुद्देकोंकणा व रणवीरने 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले.

बॉलिवूड कपल्सपैकी आणखी एका कपलचे लग्न कायदेशीररित्या संपुष्टात आले आहे. होय, अभिनेत्री कोंकणा सेन आणि अभिनेता रणवीर शैरी यांनी लग्नाच्या 10 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया गुरुवारी पूर्ण झाली.
खरे तर कोंकणा व रणवीर दोन महिन्यांआधीच घटस्फोट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही तारीख पुढे ढकलली गेली. यानंतर दोघांना गेल्या 3 आॅगस्टची तारीख देणार होती. तथापि काही कागदोपत्री कारवाईमुळे ही तारीख पुन्हा 13 पर्यंत पुढे ढकलली गेली होती. अखेर काल दोघांचा घटस्फोट मंजूर झाला.

2015 पासून कोंकणा व रणवीर एकमेकांपासून विभक्त झाले होते. तेव्हापासून ते वेगळे राहत होते. 2015 मध्ये ‘तितली’ या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी खुद्द रणवीरने ही बातमी कन्फर्म केली होती. आता मी कोंकणासोबत नात्यात नाही, असे त्याने सांगितले होते. शिवाय हे नाते तुटण्यासाठी मी स्वत: जबाबदार आहे, असेही तो म्हणाला होता.


 

घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यापूर्वी कोंकणा व रणवीर दोघांनीही काऊन्सिलिंगच्या मदतीने आपल्या नात्याला एक दुसरी संधी देण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला व त्यांनी घटस्फोट घेणेच योग्य समजले.
 रणवीर व कोंकणाचा सहा वर्षांचा मुलगा आहे. परस्पर सामंजस्याने दोघांनी मुलासाठी जॉइंट कस्टडीचा पर्याय निवडला आहे. नात्यात कटुता असली तरी दोघेही मुलगा हरून याची मिळून काळजी घेत आले आहेत.


 
कोंकणा व रणवीरने 2010 मध्ये लग्न केले होते. दोघांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केले. ट्रॅफिक सिग्नल, मिक्स्ड डबल्स अशा चित्रपटांत दोघे एकत्र दिसले. एकत्र काम करतानाच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते आणि दोघांनी लग्न केले होते. लग्नाआधीच कोंकणा प्रेग्नेंट होती. यामुळे या लग्नाची बरीच चर्चा झाली होती. 2016 मध्ये प्रदर्शित ‘डेथ इन अ गंज’ हा रणवीर व कोंकणाचा एकत्र असा शेवटचा सिनेमा होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranvir shorey and konkona sen sharma get divorced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.