बॉलिवुड सुपरस्टार रणवीर सिंग मराठी व्यक्तिरेखा साकारण्यास सज्ज झाला आहे. एका विनोदी जाहिरातीत रणवीरने मराठी व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे. बायको फेकून मारत असलेली भांडी तो चुकवतोय, असं यात दिसतं. ही जाहिरात आणि त्याचे फोटो इथे पाहता येतील.


 
संपूर्ण ऑर्डर विकली गेल्यानंतर मित्रांसोबत रात्रभर गच्चीवर सेलिब्रेट केल्यानंतर बायकोची क्षमा मागताना रणवीर या जाहिरात अस्खलीत  मराठी बोलतो. तो म्हणतो, "अरे काय करतेयेस तू, सॉरी म्हणतो ना."सिम्बा आणि बाजीराव मस्तानी अशा दोन बॉक्स ऑफिस ब्लॉकब्लस्टर सिनेमात रणवीरने यापूर्वी मराठी व्यक्तिरेखा साकारली होती.


आपल्या कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. रणवीर अनेक शो आणि कार्यक्रमात रंगीबेरंगी किंवा थोड्या हटके स्टाईलचे कपडे घालतो. त्याच्या या स्टाईलमुळे बऱ्याचदा सोशल मीडियावर रणवीर सिंहला ट्रोल करण्यात येते. 

रणवीर सिंह सध्या 83 चित्रपटामध्ये लवकरच दिसणार आहे. हा चित्रपट 1983 च्या वर्ल्डकपमध्ये भारताने ऐतिहासिक विजयावर आधारीत आहे. रणवीर सिंह यामध्ये कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranveer Singh's marathi youth character play, viral over internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.