ठळक मुद्देरणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.

बालिवूडचा ‘अतरंगी’ स्टार कोण तर रणवीर सिंग. हो, मग ते हावभाव असो वा कपडे, रणवीर सिंग नेहमीच आपल्या चाहत्यांना थक्क करतो. सध्या रणवीर त्याच्या ड्रॅक्युला लूकमुळे चर्चेत आहे. होय, रणवीरने बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात रणवीर कृत्रिम दात लावून ड्रॅक्युला बनला आहे. अर्थात त्याचा हा ड्रॅक्युला अवतार पाहून घाबरायला होत नाही तर उलट त्याच्या प्रेमात पडायला होते.  डोक्यावर शिंग असेलेल्या एका इमोजीसह रणवीरने हा फोटो शेअर केला आहे. 


रणवीरचा हा फोटो पाहिल्यावर अनेकांना ‘पद्मावत’मधील खिल्जीची आठवण झाली. रणवीर लहानपणापासूनच ड्रामेबाज आहे, याचीही अनेकांना खात्री पटली. ‘सिर्फ शक्ल बदली है, हरकतें नहीं,’ असे एका युजरने हा फोटो पाहून लिहिले. तर अन्य एका युजरने ‘मतलब कीडा बचपन से ही है,’ अशी कमेंट दिली. अनेकांनी रणवीरचा हा आत्तापर्यंतचा सर्वात क्यूट फोटो असल्याचे म्हटले.


रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  या सिनेमात तो माजी क्रिकेटर  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. कबीर खान दिग्दर्शित हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता.

या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेता जीवा हा माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका साकारणार आहे तर अभिनेता साहिल खट्टर माजी यष्टीरक्षक सैय्यद किरमानी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. तसेच मराठी अभिनेता चिराग पाटील, मान सिंग, पंकज त्रिपाठी, ताहिर भसीन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 

Web Title: ranveer singh shared her childhood picture wearing dracula teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.