ranveer singh ramp walk actor trolled for his weird activities in his friend simone fashion show | ये सच में बावला हो गया गॉड...! रणवीर सिंगचा रॅम्प वॉक एकदा बघाच!!
ये सच में बावला हो गया गॉड...! रणवीर सिंगचा रॅम्प वॉक एकदा बघाच!!

ठळक मुद्दे रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.

अभिनेता रणवीर सिंग जिथे जाईल तिथे असे काही करतो की, चर्चेत येतो.  रणवीर अभिनयाइतकाच त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे चित्रविचित्र कपडे, त्याची फॅशन सगळेच लक्षवेधी ठरते. अनेकदा यावरून तो ट्रोलही होतो. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल तो रणवीर कुठला. अलीकडे रणवीर अशा काही चित्रविचित्र कपड्यात दिसला होता की, त्याचा तो अवतार पाहून एक चिमुकली घाबरून चक्क रडू लागली होती. सध्या रणवीर त्याच्या विचित्र अशा रॅम्पवॉकमुळे ट्रोल होतोय.
नुकताच रणवीर सिमॉन खंबाटाच्या फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक करताना दिसला. पण त्याचा तो रॅम्प वॉक पाहून चाहत्यांनी त्यांची जोरदार खिल्ली उडवली.


‘ये सच में बावला हो गया गॉड,’ असे एका युजरने लिहिले.  तर अन्य एका युजरने ‘हा एन्टटेन करण्यासाठी नाही तर इरिटेड करण्यासाठीच जन्मला’ अशी प्रतिक्रिया दिली. काही युजरनी तर ‘दीपिकासाठी रणवीर नाही तर रणबीर अधिक योग्य होता,’ असेही लिहिले.


सिमॉन  ही एक ब्राईडल डिझाईनर आहे आणि रणवीरची बालपणीची मैत्रिण आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रणवीर बिझी होता आणि त्यामुळे सिमॉनला अनेक दिवसांपासून भेटला नव्हता. त्यामुळे सिमॉन मुंबईत फॅशन शो करतेय, हे रणवीरला कळते, तसाच तो तिला सरप्राईज द्यायला मुंबईत पोहोचला. रणवीरने सिमॉनला केवळ सरप्राईज दिले नाही तर तिच्यासाठी रॅम्प वॉकही केला.

 रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  या सिनेमात तो माजी क्रिकेटपटू  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. 


Web Title: ranveer singh ramp walk actor trolled for his weird activities in his friend simone fashion show
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.