ranveer singh dances at a wedding in delhi | दिल्लीच्या वेडिंग पार्टीत भान विसरून नाचला रणवीर सिंग, पाहा व्हिडीओ
दिल्लीच्या वेडिंग पार्टीत भान विसरून नाचला रणवीर सिंग, पाहा व्हिडीओ

ठळक मुद्दे रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  

 बॉलिवूडचा ‘एनर्जी किंग’ रणवीर सिंग सोशल मीडियावर कमालीचा अ‍ॅक्टिव्ह असतो. अलीकडे रणवीरने एक सेल्फी शेअर केला होता आणि या सेल्फीने रणवीर अचानक चर्चेत आला होता.  या सेल्फीला रणवीरने दिलेले कॅप्शन सर्वाधिक खास होते. होय, ‘लग्नसराई सुरु झालीय. हायर करण्यासाठी एंटरटेनर. लग्न, वाढदिवस, मुंज सर्वांसाठी मी तयार आहे....,’ असे रणवीरने कॅप्शनमध्ये लिहिले होते. ही पोस्ट तुफान व्हायरल झाली होती. केवळ इतकेच नाही तर दीपिकानेही यावर मजेशीर कमेंट करत ‘ रणवीरला हायर करण्यासाठी दीपिका पादुकोणशी संपर्क साधा,’ असे लिहिले होते.
आता या पोस्टची सत्यता सिद्ध करणारा रणवीरचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ दिल्लीच्या एका वेडिंग पार्टीतला असल्याचा दावा केला जात आहे.

या व्हिडीओत रणवीर बॉलिवूड सॉन्गवर भन्नाट डान्स करताना दिसतोय. त्याचा अंदाजही नेहमीसारखाच निराळा आहे.
 रणवीर अभिनयाइतकाच त्याच्या अतरंगी फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. त्याचे चित्रविचित्र कपडे, त्याची फॅशन सगळेच लक्षवेधी ठरते.

अनेकदा यावरून तो ट्रोलही होतो. पण या ट्रोलिंगची पर्वा करेल तो रणवीर कुठला.  रणवीर सध्या ‘83’ या चित्रपटात बिझी आहे.  या सिनेमात तो माजी क्रिकेटपटू  आणि टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. ‘83’  हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा 10  एप्रिल 2020 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: ranveer singh dances at a wedding in delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.