बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा असून सोशल मीडियावर रणवीर सिंग आणि महेश बाबू सर्वाधिक ट्रेंड होताना दिसत आहेत. गप्पा मारण्यात गुंग असलेल्या या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.


रणवीर सिंग आणि महेश बाबू यांचा व्हायरल झालेला हा फोटो एका शूट दरम्यानचा आहे. हे दोघे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. मात्र ते दोघे कोणत्या चित्रपटासाठी नाही तर एका ब्रॅण्डच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत. हे दोघेही थम्स अपचे ब्रँड अॅम्बॅसेडर असून, प्रथमच या ब्रँडच्या जाहिरातीनिमित्त स्क्रीनवर एकत्र आले आहेत. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील हे दोन दिग्गज कलाकार थम्स अपच्या जाहिरातीसाठी एकत्र आले आहेत.  त्या जाहिरातपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. दोघेही अत्यंत रफटफ वेशात असून, साहसी कामगिरीला शोभेल असा त्यांचा लूक आहे.


रणवीर सिंग याने या फोटोसह या शूट दरम्यानचे अन्य काही फोटो आणि व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दोघांचा फोटो शेअर करताना रणवीर सिंगने महेशबाबूचे कौतुक केले आहे. त्याने म्हटले की, ‘एका अत्यंत चांगल्या कलाकाराबरोबर मी काम करत आहे, ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आमच्या दोघांच्या गप्पा नेहमीच रंगतात. लव्ह अँड रिस्पेक्ट बिग ब्रदर महेश'. त्याच्या या पोस्टवर महेश बाबू यानंही उत्तर दिलं असून, रणवीरबाबत आपल्या भावना अशाच असून, त्याच्याबरोबर काम करणे हा अतिशय उत्तम अनुभव होता, असे म्हटले आहे.


रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर त्याचा लवकरच ८३ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तसेच रोहित शेट्टीच्या सर्कसमध्ये दिसणार आहे. तसेच जयेशभाई जोरदारमध्येही एका वेगळ्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.

तर महेशबाबूच्या कामाबद्दल सांगायचे तर एस.एस.राजामौली आणि परसुराम यांच्या दिग्दर्शन असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranveer Singh and Mahesh Babu came together for the first time for this project, the photo is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.