Ranveer singh and jacqueline fernandes to star in rohit shetty's 'angoor' remake | रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये

रणवीर सिंग आणि जॅकलिन फर्नांडिस पहिल्यांदाच शेअर करणार स्क्रिन, रोहित शेट्टीच्या 'अंगूर'च्या रिमेकमध्ये

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी आगामी एक कॉमेडी सिनेमाला घेऊन चर्चेत आहे. याआधी या जोडीने सिंम्बासारखा सुपरहिट सिनेमा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगचा आगामी कॉमेडी सिनेमा 80 च्या दशकातील संजीव कुमार यांचा 'अंगूर'चा रिमेक आहे.  

गुलजार यांची क्लासिक कॉमेडी अंगूरचा रोहित शेट्टी रिमेक बनवणार आहे. रोहित शेट्टी यांनी रणवीर सिंगला या चित्रपटासाठी अंतिम स्वरूप दिले असून ते संजीव कुमारच्या भूमिकेत दिसणार आहेत. रणवीर सिंग पहिल्यांदाच डबल रोलमध्ये दिसणार आहे.रिपोर्टनुसार 2015 पासून या रिमेकची तयार करतो आहे.रणवीर सिंग या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. जॅकलिन आणि रणवीर सिंग पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे दोघांचे फॅन्स यांची जोडी पडद्यावर बघण्यासाठी उत्सुक असतील. 

रोहितला आधी हा सिनेमा शाहरुख खानला घेऊन करायचा होता मात्र मग दोघांनी मिळून 'दिलवाले' बनवला. लॉकडाऊन दरम्यान रोहितने अंगूरच्या स्क्रिप्टवर काम केले आहे. 1982 मध्ये 'अंगूर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यात संजीव कुमार आणि देवेन वर्मा कॉमेडी करताना दिसले होते. या चित्रपटात मौसमी चटर्जी आणि दिप्ती नवल आणि अरुणा इराणीसुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या.गीतकार आणि दिग्दर्शक गुलजार यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranveer singh and jacqueline fernandes to star in rohit shetty's 'angoor' remake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.