ranu mondal look alike from guwahati became internet sensation singing teri meri kahani | आणखी एक ‘रानू मंडल’! सोशल मीडियावर सापडली रानूची डुप्लिकेट!!

आणखी एक ‘रानू मंडल’! सोशल मीडियावर सापडली रानूची डुप्लिकेट!!

ठळक मुद्देही महिला गुहावटीची राहणारी आहे आणि तिचा हा व्हिडीओ तन्मय देब याने शूट केला आहे.

एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आलेली आणि सध्या बॉलिवूड स्टार म्हणून ओळखली जाणारी रानू मंडल हिला तुम्ही ओळखताच. रेल्वे स्टेशनवर गातानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत आलेली रानू मंडल आता बॉलिवूड सिंगर आहे. ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे गातानाचा तिचा पहिला व्हिडीओ व्हायरल झाला आणि या व्हिडीओने तिला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली.  हिमेश रेशमियाच्या सिनेमासाठी एकापाठोपाठ एक अशी तीन गाणी तिने गायली. आता याच रानू मंडलची डुप्लिकेट सापडली आहे. 
होय, सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात रानू मंडल सारखी दिसणारी एक महिला गाणे गाताना दिसतेय. विशेष म्हणजे, रानूनेच गायलेले ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे ती गात आहे. अर्थात तिचे गाणे फार काही खास नाही. पण तिचा चेहरा मात्र हुबेहुब रानू मंडलशी मिळताजुळता आहे.
ही महिला गुहावटीची राहणारी आहे आणि तिचा हा व्हिडीओ तन्मय देब याने शूट केला आहे.  ‘ही रानू मंडल 2.0 आहे,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे.


 रानूने आतापर्यंत हिमेश रेशमियाचा  ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’ या चित्रपटासाठी तीन गाणी गायली आहेत. ज्यातील ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. सध्या रानू सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते.

काही दिवसांपूर्वी एका चाहतीला फटकारत असतानाचा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर तिच्या मेकओव्हरमुळे ती चर्चेत आली होती. हेवी मेकअप केलेला तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे रानू प्रचंड ट्रोल झाली होती. नंतर रानूच्या मेकअप आर्टिस्टने हा फोटो फेक असल्याचे सांगत खरा फोटो शेअर केला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranu mondal look alike from guwahati became internet sensation singing teri meri kahani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.