ठळक मुद्देरंजीत यांची मुलगी आणि पत्नी दोघेही दिसायला अतिशय सुंदर असून या फोटोसोबत त्यांनी एक खूप छान कॅप्शन लिहिली आहे. त्यांनी या फोटोसोबत लिहिले आहे की, माझे रक्त पिणारी हीच ती जोडी...

रंजीत यांनी हलचल, धर्मात्मा, लैला मजनू, विश्वनाथ, सुहाग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी चित्रपटांप्रमाणे मालिकांमध्ये देखील काम केले आहे. ऐसा देश है मेरा, हिटलर दिदी, जुगनी चली जलंधर यांसारख्या मालिकांमध्ये त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. रंजीत यांनी बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले असले तरी त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी खूपच कमी जणांना माहीत आहे. 

रंजीत सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते त्यांच्या आगामी चित्रपटांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्याचसोबत ते जुन्या चित्रपटांचे फोटो पोस्ट करून जुन्या आठवणींना उजाळा देतात. त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याच्या खाजगी आयुष्यातील खूपच कमी फोटो आपल्याला पाहायला मिळतात. पण त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकताच त्यांच्या पत्नीचा आणि मुलीचा फोटो शेअर केला आहे. त्यांची मुलगी आणि पत्नी दोघेही दिसायला अतिशय सुंदर असून या फोटोसोबत त्यांनी एक खूप छान कॅप्शन लिहिली आहे. त्यांनी या फोटोसोबत लिहिले आहे की, माझे रक्त पिणारी हीच ती जोडी... माझी मुलगी आणि पत्नी. पण मला त्यांचे हे काम आवडते. कारण यामुळे माझ्या शरीरात नवीन रक्त निर्माण होते. त्या दोघींचा फोटो रंजीत यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

रंजीत यांचे खरे नाव रंजीत नसून हे नाव त्यांना बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध नायकाने दिले असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी द कपिल शर्मा शोमध्ये सगळ्यांसोबत शेअर केले होते. याविषयी रंजीत यांनी सांगितले होते की, माझे खरे नाव गोपाळ आहे. सुनील दत्त यांचा माझ्या आयुष्यावर खूप प्रभाव आहे. माझे नाव हे खूपच कॉमन असल्याचे त्यांना वाटत असल्याने त्यांनी माझे नाव रंजीत ठेवण्याविषयी सुचवले. माझे आणि त्यांचे संबंध खूपच चांगले होते. माझ्या आयुष्यातील अतिशय जवळच्या व्यक्तींपैकी ते एक होते असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मी चित्रपटात खलनायकाच्या भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात मी खूपच वेगळा आहे. अनेक चित्रपटात मला दारू पिताना दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात मी दारू, सिगारेटला कधी स्पर्श देखील केला नाही. एवढेच नव्हे तर मी शुद्ध शाकाहारी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranjeet shares wife and daughters picture on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.