Rani mukerji's mardaani 2 teaser out | राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'चा दमदार टीझर आऊट

राणी मुखर्जीच्या 'मर्दानी 2'चा दमदार टीझर आऊट

 लग्नानंतर राणी मुखर्जी बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी तयार झाली आहे. 'मदार्नी 2'मधून राणी कमबॅक करण्यास सज्ज झाली आहे. तिचा हा सिनेमा  १३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'मर्दानी 2' चा टीझर आऊट झाला आहे. पुन्हा एकदा राणी अॅक्शन अवतारात दिसतेय. टिझरमध्ये राणी पोलिसांच्या ड्रेसमध्ये दिसतेय. यश राज फिल्मसने हा टीझर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. टिझरमध्ये राणीचे दमदार डायलॉग ऐकायला मिळतं आहेत.  ‘मर्दानी 2’ या चित्रपटात राणी पुन्हा एकदा एक निर्भय व कर्तव्यदक्ष पोलिस अधिक्षक शिवानी शिवाजी रॉयची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मर्दानी’च्या प्रीक्वेलमधील राणीची भूमिका सुपरहिट ठरली होती आणि तिचे बरेच कौतुक झाले होते. त्या सिनेमात राणीने बाल तस्करीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

त्यामुळे सिक्वेलमध्ये राणीच्या विरुद्ध कोण खलनायक साकारणार याविषयी मोठी उत्सुकता आहे. यापूर्वी राणीच्या ‘हिचकी’ने जगभर धुमाकूळ घातला होता. आता लवकरच आदित्य चोप्रा निर्मित या सिनेमात राणीचे दर्शन घडेल.  ‘मर्दानी’चा लेखक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ च्या माध्यमातून दिग्दर्शनात पदार्पण करणार आहेत.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rani mukerji's mardaani 2 teaser out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.