अभिनेता रणदीप हुड्डाने काम सुरु केले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचे शूटिंग आणि प्रोडक्शनचे काम थांबले होते. आता पुन्हा एकदा सिनेमांची शूटिंग सुरु झाली आहे. रणदीप सलमान खान आणि दिशा पटानीसोबत 'राधे- मोस्ट वांटेड भाई'मध्ये दिसणार आहे. रणदीपने या सिनेमाच्या डबिंगच्या कामाला सुरुवात केली आहे. 

रणदीप हुड्डाने स्वत: ही माहिती ट्विटवरुन दिली, रणदीपने ट्विटरवर एका फोटो शेअर केला आहे ज्यात तो माईकसमोर उभा दिसतो आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ''कामावर परतल्यानंतर चांगलं वाटतंय.'' हॅशटॅग राधे.

काही दिवसांपूर्वी रणदीप हुड्डाची एक मोठी सर्जरी झाली. रणदीप म्हणाला की, १२ वर्षांपूर्वी झालेल्या अपघातानंतर त्याच्या पायात मेटल प्लेट्स घातल्या गेल्या ज्यामुळे त्याला संसर्ग झाला आणि म्हणूनच त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.रणदीपला शस्त्रक्रियेसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

काही महिन्यांपूर्वीच अभिनेता रणदीप हुड्डा सॅम हॅग्रावचं निर्देशन असलेल्या 'एक्सट्रॅक्शन' या सिनेमात दिसला होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्याने हॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या सिनेमात सुपरहिरो थॉर क्रिस हेम्सवर्थची मुख्य भूमिका होती. या सिनेमाची निर्मिती रूसो ब्रदर्स द्वारे करण्यात आली होती. या सिनेमातील रणदीपच्या कामाचं भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.  2001 मध्ये मीरा नायर यांच्या ‘मान्सून वेडिंग’ या चित्रपटाद्वारे रणदीपने आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Randeep hooda started dubbing for salman khans movie radhey recently underwent surgery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.