सलमान खान व रणदीप हुडा गोव्यात शूट करणार अ‍ॅक्शन सीन, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:00+5:30

रणदीप हुडा सलमान खानसोबत एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

Randeep Hooda and Salman Khan to shoot the action scenes of Radhe in Goa | सलमान खान व रणदीप हुडा गोव्यात शूट करणार अ‍ॅक्शन सीन, जाणून घ्या याबद्दल

सलमान खान व रणदीप हुडा गोव्यात शूट करणार अ‍ॅक्शन सीन, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

बॉलिवूडचा दंबग खान म्हणजेच अभिनेता सलमान खानचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला चित्रपट 'दबंग ३'ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर आता सलमान खान 'राधे' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात सलमान सोबत रणदीप हुडादेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. लवकरच सलमान व रणदीप दोघेही गोव्यामध्ये शूटिंग करणार आहेत.

'राधे' चित्रपटाचे गोव्यात २० दिवसांचे शूटिंग शेड्युल आहे. निर्माते खऱ्या लोकेशनवर सलमान आणि रणदीपसोबत शूटिंग करणार आहे. त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांकडून परवानगीदेखील घेतली आहे. निर्माते सलमान व रणदीप यांच्यामधील अॅक्शन सीन चित्रीत करणार आहेत. यावेळी कोरियन स्टंट टीम व लोकेशन स्टंट टीमसोबत असणार आहे. स्टंट टीमने या महिन्याच्या सुरूवातील या ठिकाणची रेकी करून जागा फायनल केल्या आहेत.


गोव्यातील चर्च, गल्ली व समुद्राच्या ठिकाणी राधेचे शूटिंग होणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिशा पटानी मुख्य भूमिकेत असून तीदेखील या शूटमध्ये सहभागी होणार आहे. कारण तिकडे दिशा पटानी सलमान खानसोबत एका गाण्याचे चित्रीकरण करणार आहे. 

या चित्रपटात सलमान नेहमीपेक्षा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं सलमान खान आणि प्रभूदेवा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

तर भारत सिनेमात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसलेली दिशा पटानी या चित्रपटात सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तसेच अभिनेता जॅकी श्रॉफ यांचीही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

सलमान खान फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड करत आहे. 'राधे' चित्रपट २०२०मध्ये ईदच्या वेळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  
 

Web Title: Randeep Hooda and Salman Khan to shoot the action scenes of Radhe in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.