Ranbir's parents see Bollywood's 'Hey' hot couple! | बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत !

बॉलिवूडचे ‘हे’ हॉट कपल दिसणार रणबीरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत !

 रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा चित्रपट ‘ब्रम्हास्त्र’ सध्या चर्चेत आहे. रिलीजच्या तारखांचा ताळमेळ बसत नसल्याने दिग्दर्शक अयान मुखर्जी चिंतेत आहे. सुत्रांकडून एक नवी माहिती मिळतीये ती म्हणजे, या चित्रपटात बॉलिवूडचे एक हॉट कपल रणबीर कपूरच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. तुम्हाला हे कळाल्यावर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. कोण आहे हे कपल? बॉलिवूडचा हॅण्डसम मॅन रणवीर सिंग आणि गॉर्जिअस अभिनेत्री दीपिका पादुकोण. होय, तुम्ही वाचताय ते अगदी खरे आहे.


 सुत्रांक डून मिळालेल्या माहितीनुसार, ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याने रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्याकडे चित्रपटातील रणबीरच्या व्यक्तिरेखेचे आई-वडील बनण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आहे. अद्याप याबाबत रणवीर-दीपिका यांच्याकडून कुठलीही ठोस माहिती आलेली नाही. पण, या चित्रपटाच्या ट्रॅकनुसार, रणबीरच्या व्यक्तिरेखेचे आई-वडील हे तरूण दिसणे अपेक्षित असल्याने दिग्दर्शक मंडळींकडून या हॉट कपलला विचारणा करण्यात आली आहे.


‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटाबद्दल अशातच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत रणबीर कपूर चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल गंमत करत असल्याचे दिसले होते. हा व्हिडीओ नंतर चांगलाच चर्चेत आला. या व्हिडीओला नेटिझन्सचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले.

Web Title:  Ranbir's parents see Bollywood's 'Hey' hot couple!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.