Ranbir Kapoor tests positive for Covid-19? what his uncle Randhir Kapoor has to say | रणबीर कपूरला कोरोनाची लागण; नीतू कपूर यांनी केले कन्फर्म

रणबीर कपूरला कोरोनाची लागण; नीतू कपूर यांनी केले कन्फर्म

ठळक मुद्देवर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र झळकणार आहेत.

 कपूर कुटुंबाची चिंतेत आणखी भर पडली आहे. ऋषी कपूर यांचा मुलगा अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत, ही बातमी कन्फर्म केली आहे.
  रणबीर कपूरची प्रकृती ठीक नसल्याचे आणि त्याला कोराना झाल्याचे वृत्त आले होते. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. आता नीतू कपूर यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला. ‘तुम्ही दाखवलेली चिंता आणि शुभेच्छांसाठी आभार. रणबीरची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत आणि तो बरा होतोय. सध्या तो घरीच सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. सर्वजण काळजी घ्या,’ अशी पोस्ट नीतू यांनी शेअर केली आहे.

त्यापूर्वी रणधीर कपूर यांनी रणबीर सध्या आजारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता मात्र त्याला कोरोना झाल्याच्या वृत्तावर बोलणे त्यांनी टाळले होते.
रणबीरला खरंच कोरोना झाला आहे का? हे जाणून घेण्यासाठी रणधीर कपूर यांच्याशी संपर्क साधला असता, आधी त्यांनी ‘हो’ म्हटले होते. मात्र नंतर लगेच त्याला कोरोनाची लागण झाली आहे वा नाही, याबाबत मला माहिती नाही. कारण मी मुंबई बाहेर आहे. रणबीर आजारी असून तो आराम करतोय, असे सांगितले होते.
  याआधी रणबीरची आई आणि अभिनेत्री नीतू कपूरदेखील ‘जुग जुग जियो’ या सिनेमाच्या सेटवरच कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. याच दरम्यान अभिनेता वरुण धवनही कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याआधी महानायक अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, अर्जून कपूर, मलायका अरोरा या कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली होती.

 

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात एकत्र झळकणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  अयान मुखर्जी हा सिनेमा दिग्दर्शित करतोय. हा सिनेमा तीन भागात बनवला जाणार  आहे. याशिवाय ‘शमशेरा’ या सिनेमातही रणबीर कपूर झळकणार आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Ranbir Kapoor tests positive for Covid-19? what his uncle Randhir Kapoor has to say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.