ठळक मुद्देरणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो गर्लफ्रेन्ड आलिया भट हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या आलिया भटला डेट करतोय. तूर्तास दोघांच्याही अफेअरच्या बातम्या जोरात आहेत. पण याचदरम्यान रणबीर कपूरने एक मोठा खुलासा केला आहे.  त्याच्या या खुलाशाने अन्य कुणी नाही पण आलिया मात्र नाराज होऊ शकते. होय, रणबीर आलियासोबत रिलेशनशिपमध्ये असला तरी अजुनही तो दीपिका पादुकोण आणि कतरीना कैफ या त्याच्या दोन एक्स -गर्लफ्रेन्डला सोशल मीडियावर फॉलो करतो. खुद्द रणबीरने एका ताज्या मुलाखतीत याबाबतची कबुली दिली आहे.


खरे तर रणबीरचे सोशल मीडियावर अकाऊंट नाही. रणबीरने स्वत: सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावरच्या नकारात्मकतेपासून दूर राहणे हा यामागचा त्याचा उद्देश आहे. पण असे असले तरी रणबीरचे एक फेक अकाऊंट सोशल मीडियावर आहे.

या अकाऊंटद्वारे तो बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना फॉलो करतो. यात आलिया भटपासून रणवीर सिंग, दीपिका पादुकोण, कतरीना कैफ अशा अनेकांची नावे आहेत. 


अगदी अलीकडे कतरीनाने सोशल मीडियावर रणबीरचे फेक अकाऊंट असल्याचे सांगितले होते. रणबीरमुळेच मी सोशल मीडियावर आले. त्याने मला अकाऊंट उघडून दिले होते. माझे अकाऊंट फेक नाही. पण रणबीरचे मात्र सोशल मीडियावर फेक अकाऊंट असल्याचे मला माहित आहे, असे अलीकडे एका मुलाखतीत कॅट म्हणाली होती.
रणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटात तो गर्लफ्रेन्ड आलिया भट हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या २० डिसेंबरला प्रदर्शित होत आहेत. आलिया, रणबीरशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन, मौनी रॉयही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranbir kapoor revealed he follows deepika padukone katrina kaif and alia bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.