ठळक मुद्देहा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भटने रविवारी तिचा 27 वा वाढदिवस साजरा केला. तिच्या या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटोही व्हायरल झालेत. या फोटोत आलिया तिची बहीण शहीनसोबत बर्थ डे केक कापताना दिसली. पण रणबीर कपूर मात्र कुठेही दिसला नाही. आलियाच्या बर्थ डे सेलिब्रेशनमध्ये तिचा बॉयफ्रेन्ड रणबीर कपूर हजर नसल्याचे पाहून अनेक चर्चा रंगल्या. पण आता ‘रालिया’च्या चाहत्यांसाठी आलिया व रणबीरचा एक फोटो समोर आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या फोटोत रणबीर कपूर आलियाला किस करताना दिसतोय. पण या फोटोत हेच एक हॉट कपल नाही तर आणखी एक दुसरे हॉट कपलही दिसतेय. होय, फोटोत आलिया व रणबीरच्या मागे अर्जुन कपूरमलायका अरोराही दिसत आहेत. अर्जुन मलायकाला किस करतोय. सोशल वर्कर व फॅशन जगतातील सेलिब्रिटी नताशा पुनावालाने हा फोटो तिच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे.

हा फोटो समोर येताच दोन्ही जोडप्यांचे चाहते क्रेजी झाले आहेत. आलिया व रणबीरचे फॅन्स तर कधी नव्हे इतके क्रेजी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया व रणबीर यांच्या लव्ह अफेअरच्या चर्चा आहेत. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचेही मानले जात आहे. 

दुसरीकडे मलायका अरोराअर्जुन कपूरचे प्रेमही जोरात आहे. मलायका व अर्जुनने आपले प्रेम कधीच जगजाहिर केले आहे. अलीकडे दोघेही सर्रास एकमेकांसोबत फिरताना दिसतात. एकंदरीत काय तर दोन्ही कपल एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आता प्रतीक्षा ती केवळ यांच्या लग्नाची.

Web Title: ranbir kapoor kiss with love to alia bhatt and we spot malaika arora and arjun kapoor kissing-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.