ranbir kapoor bitten by his pet dog and actor rushed to visit a hospital | रणबीर कपूरला पाळीव कुत्र्यानेच घेतला चावा, अभिनेता पोहोचला रूग्णालयात

रणबीर कपूरला पाळीव कुत्र्यानेच घेतला चावा, अभिनेता पोहोचला रूग्णालयात

ठळक मुद्दे रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहे.

रणबीर कपूर आणि त्याच्या पाळीव कुत्र्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. रणबीरचे त्याच्या डॉगीवर किती प्रेम आहे, याचा अंदाज हे व्हिडीओ पाहिल्यानंतर येतो. पण आता रणबीरच्या डॉगीनेच त्याच्यावर हल्ला करत त्याला जखमी केले. यानंतर रणबीरला ताबडतोब रूग्णालयात धाव घ्यावी लागली.

टाइम्स आॅफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, रणबीरच्या डॉगीने त्याच्या चेह-याला चावा घेतला. चेहºयावर जखम झाल्याने रणबीरने कुठलीही रिस्क न घेता थेट रूग्णालय गाठले. लॉकडाऊन असूनही रणबीर रूग्णालयात पोहोचला आणि त्याने उपचार घेतले. अर्थात रणबीर वा कपूर कुटुंबीयांनी अद्याप या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.


  
काही दिवसांपूर्वी रणबीरने आई नीतू कपूरचा वाढदिवस साजरा केला होता. रणबीरची बहिण रिद्धिमा कपूरने  ही पार्टी होस्ट केली होती. या पार्टीचे काही फोटोही समोर आले होते. रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, लवकरच तो अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तो त्याची गर्लफ्रेन्ड आलिया भटसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. अमिताभ बच्चन व नागार्जुन यांचीही यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा याचवर्षी रिलीज होणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिलीज डेटमध्ये बदल होऊ शकतो.  

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranbir kapoor bitten by his pet dog and actor rushed to visit a hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.