ठळक मुद्देरणबीर कपूर आज एक खूप मोठा स्टार आहे, पण आजही तो आई नीतू सिंग हिच्याकडून दरमहा १५०० रुपए पॉकेटमनी घेतो. 

लाखों तरूणींच्या ‘दिलाची धडकन’ रणबीर कपूर याचा आज वाढदिवस. 28 सप्टेंबर 1982 रोजी कपूर घराण्यात रणबीरचा जन्म झाला आणि बॉलिवूडला आणखी एक स्टार मिळाला. आज रणबीरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे काही बालपणीचे फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे फोटो कदाचितच याआधी तुम्ही पाहिले असतील. या फोटोंमध्ये रणबीर  ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू सिंहसोबत दिसत आहे.  काही छायाचित्रांमध्ये तो त्याचे आजोबा  राज कपूर यांच्यासोबत दिसत आहे.

रणबीरच्या जन्मामुळे कपूर कुटुंबातीलप्रत्येक जण आनंदी होता. पण राज कपूर यांच्या आनंदाला मात्र पारावार राहिला नव्हता. कारण रणबीर हा राज कपूर यांचा पहिला नातू होता. त्यांना नाती होत्या. पण रणबीर हा पहिला नातू होता.

ऋषी कपूर यांनी ‘खुल्लम खुल्ला’ या आपल्या बायोग्राफीत राज कपूर यांच्या रणबीरवर असलेल्या प्रेमाबद्दल लिहिले आहे. रणबीरच्या जन्मावेळी आमच्या कुटुंबात वेगळाच आनंद होता. पप्पाला नाती होत्या. पण त्यांना नातू हवा होता.  रणबीरच्या जन्माने त्यांची ही इच्छा पूर्ण झाली, असे ऋषी यांनी या बायोग्राफीत लिहिले आहे.

रणबीरवर राज कपूर यांचा विशेष जीव होता. म्हणूनच कपूर घराण्याचा अनमोल ठेवा त्यांनी रणबीरच्या नावे केला. होय, यातील अनमोल ठेवा म्हणजे, कपूर घराण्याचा एक पूर्वजांची आठवण असलेले सोन्याचे नाणे. या नाण्यावर अफगाणी भाषेतील काही शब्द कोरलेले आहेत. कपूर घराण्याच्या पेशावरही संबंध राहिला आहे, हे आपण जाणतोच. याशिवाय सोन्यांच्या नाण्यांची एक माळही राज कपूर यांनी रणबीरला दिली होती.

रणबीर कपूर कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाही. पण चोरून लपून तो सगळ्यांनाच फॉलो करतो. त्यांचे फोटो बघतो.

वयाच्या १५ व्या वर्षी रणबीरला निकोटीन ड्रग्जचे व्यसन लागले होते. रणबीरने 'संजू'च्या प्रमोशनवेळी याची कबुली दिली होती. हे व्यसन सोडवण्यासाठी मी आॅस्ट्रेलियाला गेलो होतो. डॉक्टरांनी माझ्या कानात इंजेक्शन दिले होते, असे त्याने सांगितले होते.

रणबीर कपूर आज एक खूप मोठा स्टार आहे, पण आजही तो आई नीतू सिंग हिच्याकडून दरमहा १५०० रुपए पॉकेटमनी घेतो. 


Web Title: ranbir kapoor birthday special, unseen pics of birthday boy
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.