ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने या लग्नाबद्दलची हिंट दिली होती.

आलिया भटरणबीर कपूर यांचे नाते आता जगजाहिर झाले आहे. बॉलिवूडचे हे सुंदर कपल लवकरच लग्न करणार, असे मानले जात आहे. अद्याप रणबीर-आलिया या दोघांपैकी कुणीही लग्नाबद्दल बोलायला तयार नाही. पण लग्नाच्या बातम्या त्यांनी नाकारलेल्याही नाहीत. काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणने या लग्नाबद्दलची हिंट दिली होती. पण हिंटही चाहत्यांचे फार समाधान करणारी नव्हती. पण आता रणबीर व आलियाच्या लग्नावर एका ज्योतिष्याने भाकित वर्तवले आहे. होय, हे लग्न होईल. पण या लग्नात विघ्नही येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असे भाकित या ज्यातिषाने वर्तवले आहे.


विरल भयानी यांनी याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये आचार्य विनोद कुमार नामक ज्योतिष्याने वर्तवलेल्या भाकिताचा उल्लेख आहे. रणबीर व आलियाच्या कुंडलीनुसार 2019 च्या ऑक्टोबर ते 2020 पर्यंत दोघांच्या लग्नाचा मोठा योग आहे. प्रेमाचा ग्रह मानला जाणारा शुक्र दोघांच्याही कुंडलीत उच्चस्थानी आहे. तथापि आलियाच्या कुंडलीतील ग्रहदशा बघितली तर या नात्यात काही गैरसमज व गोंधळ होण्याचीही शक्यता आहे. ज्यामुळे हे लग्न लांबणीवर पडू शकते, असे या ज्योतिषाने म्हटले आहे.

केवळ इतकेच नाही तर या कपलने लग्न केलेच तर हे लग्नबंधन आलिया व रणबीरला एका वेगळ्या उंचीवर नेणारे ठरले. या दोघांना नात्यात पुढे जाण्यापासून कुठलीही शक्ती आता थांबवू शकत नाही, असे भाकितही वर्तवण्यात आले आहे.


आता या भाकितात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. पण   रणबीर व आलियाच्या लग्नाबद्दलचे भाकित वर्तवणारी ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: ranbir kapoor alia bhatt wedding prediction such an issue might come

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.