Rana Daggubati breaks down as he REVEALS of his critical health condition on Samantha Akkineni's show | Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला

Video : किडनी फेल होत होती, जीवालाही धोका होता...! राणा दग्गुबाती पहिल्यांदा आजाराबद्दल बोलला

ठळक मुद्देबाहुबली फेम राणा दग्गुबाती यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकला.

ब्लॉकबस्टर हिट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबाती याचा या चित्रपटातील अभिनय सगळ्यांनाच सुखावणारा होता. चित्रपटातील त्याची भूमिका निगेटीव्ह असली तरी राणाचा अभिनय ठळकपणे डोळ्यात भरला होता. बाहुबली अर्थात प्रभासच्या तोडीस तोड व्यक्तिरेखा त्याने साकारली होती. हा राणा अचानक चर्चेत आलाय. कारण काय तर आजारपणाबद्दलचा त्याचा खुलासा. होय, समांथा अक्किनेनीच्या चॅट शोमध्ये राणाने असा काही खुलासा केला की, सगळ्यांनाच धक्का बसला. फॅन्स आणि खुद्द समांथाही भावूक झाली. या चॅट शोचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

चॅट शोमध्ये राणा सांगतो,‘आयुष्य फास्ट फॉरवर्ड सुरु असताना अचानक एक पॉज बटण दाबल्या जाते. माझ्या आयुष्यातही असेच काही घडले. मला बीपी होता. हृदयाच्या चारही बाजूंना कॅल्सिफिकेशन होते. किडनी फेल होत होती. हॅमरेजचा 70 टक्के चान्स होता आणि जीव जाण्याचा धोका 30 टक्के होता.’

गेल्या वर्षी जुलै महिन्यात राणाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात तो प्रचंड अशक्त आणि आजारी दिसला होता.  राणावर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली, अशी चर्चा त्यावेळी होती. अर्थात राणाने किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याच्या चर्चा धुडकावून लावल्या होत्या. ‘मी आपल्या आरोग्याबाबत वेगवेगळ्या विचित्र चर्चा ऐकतोय. मी ठीक आहे, मित्रांनो,फक्त काही बीपीसंदर्भातील तक्रारी आहेत. चिंता आणि प्रेम यासाठी आभार. पण कृपया अफवा पसरवू नका. हे माझे आरोग्य आहे, तुमचे नाही,’ असे राणाने स्पष्ट केले होते.

यानंतर पहिल्यांदा राणाने त्याच्या आजारपणाबद्दल खुलासा केला. राणाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर लवकरच राणा ‘हाथी मेरे साथी’ या सिनेमात दिसणार आहे. अनेक भाषांमध्ये बनवण्यात आलेल्या या सिनेमात राणाशिवाय पुलकित सम्राट, श्रिया पिळगावकर मुख्य भूमिकेत आहेत. बाहुबली फेम राणा दग्गुबाती यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकला. 

लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो

राणा दग्गुबातीच्या लग्नाचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का? आठवडाभरानंतर आलेत समोर

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rana Daggubati breaks down as he REVEALS of his critical health condition on Samantha Akkineni's show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.