Rana daggubati miheeka bajaj vacation photo goes viral | लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो

लग्नाच्या 2 महिन्यानंतर मिहिका बजाजने शेअर केला पती राणा दग्गुबातीसोबतचा लेटेस्ट फोटो

बाहुबली फेम राणा दग्गुबाती यावर्षी ऑगस्ट महिन्यात लग्नाच्या बेडीत अडकला. दोन महिन्यानंतर राणा मिहिकासोबत व्हॅकेशन एन्जॉय करतोय, दोघांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल होते आहे. 

मिहिकाने राणा दग्गुबातीसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत तिने राणा दग्गुबातीला टॅग केले आहे. या फोटोला बघून दोघे कुठे तरी सुट्ट्या एन्जॉय करतायेत असा अंदाज लावला जातोय. राणा आणि मिहिकाने कोरोना काळात लग्न केले. हा लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडला. करोनाच्या पार्श्वभूमीवर या विवाहसोहळ्याला मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. 


मिहीका इंटिरिअर डिझायनर असून एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मालकीण आहे. मिहीकाचे वडिल हैदराबादमधील नामांकित सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी आहेत. तर आई ज्वेलरी डिझायनर आहे.

बाहुबली या चित्रपटामुळे राणा दुग्गबती हे नाव चांगलेच चर्चेत आले. त्याने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्याला बाहुबली या चित्रपटामुळे जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले. राणाने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. राणाला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग असून त्याच्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते.
 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rana daggubati miheeka bajaj vacation photo goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.