ठळक मुद्देरंभाने 2010 मध्ये इंद्रकुमार प्रथमन्थान या व्यवसायिकासोबत लग्न केले होते. ते मुळचे चेन्नईचे असले तरी त्यांचा व्यवसाय टोकियोत आहे. ती गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत टोकियोमध्येच राहाते.

रंभाचा आज वाढदिवस असून तिने बॉलिवूडसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभाने अतिशय कमी वयात अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. केवळ 15 वर्षांची असताना तिने एका दाक्षिणात्य चित्रपटात काम केले होते. तिच्या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे तिला दाक्षिणात्य चित्रपटांच्या अनेक ऑफर मिळाल्या लागल्या. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने आजवर 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे बालपण आंध्रप्रदेशमध्ये गेले असून ती सातवीत असताना तिच्या शाळेतील एका कार्यक्रमाला दिग्दर्शक हरीहरण यांनी उपस्थिती लावली होती. त्यांनीच तिला सरगम या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात लाँच केले. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी जुडवा या चित्रपटामुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या चित्रपटासोबतच सलमानच्या बंधन, घरवाली बाहरवाली, बेटी नं.1 यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. जानी दुश्मन या चित्रपटानंतर ती कोणत्याच हिंदी चित्रपटात झळकली नाही.

बॉलिवूडला रामराम ठोकल्यानंतर देखील ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत होती. पण लग्नानंतर तिने चित्रपटांत काम करणे कमी केले. ती टेलिव्हिजनवरील काही कार्यक्रमांमध्ये 2017 पर्यंत परीक्षकाची भूमिका बजावत होती. पण आता ती चित्रपटसृष्टीपासून दूर असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या कुटुंबियांसोबत घालवते. रंभा चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 

रंभाने हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांसोबतच काही भोजपुरी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. तिने 2010 मध्ये इंद्रकुमार प्रथमन्थान या व्यवसायिकासोबत लग्न केले होते. ते मुळचे चेन्नईचे असले तरी त्यांचा व्यवसाय टोकियोत आहे. ती गेल्या काही वर्षांपासून आपल्या कुटुंबियांसोबत टोकियोमध्येच राहाते. त्या दोघांना दोन मुली असून एक मुलगा आहे. तिच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर तिचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. या फोटोत तिच्या कुटुंबियांचे फोटो देखील असून तिची मुले खूपच छान आहेत. रंभाचे फोटो पाहिले तर तिच्यात काहीच बदल झालेला नाहीये असेच आपण म्हणू शकतो. कारण आजही रंभा तितकीच सुंदर दिसते.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rambha Birthday Special : Rambha settled down in Tokyo with her family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.